भोकर येथील ग्रामीण रुग्णालयाच्या नुतन वैद्यकीय अधीक्षक डॉ.प्रताप चव्हाण यांचा सत्कार संपन्न


                  प्रतिनिधी / माली पाटील 

∆ भोकर येथील शासकीय ग्रामीण रुग्णालयाच्या वैद्यकीय अधीक्षक पदाच्या पदभार डॉ.प्रताप चव्हाण यांनी स्विकारला असल्याने त्यांचा सत्कार शिवसैनिक व पत्रकार यांच्या वतीने करण्यात आला.

    भोकर येथील शासकीय ग्रामीण रुग्णालयाच्या रिक्त जागेवर डॉ.प्रताप दिगंबरराव चव्हाण हे रुजु झाले आहेत.त्यामुळे नुतनच भोकर रुग्णालयाचा कारभार डॉ.चव्हाण यांनी स्विकारला असल्याने दि.९ जुलै रोजी शिवसैनिक व पत्रकारांच्या वतीने त्यांचा शाल श्रीफळ व पुष्पगुच्छ सन्मान करण्यात आला. सोबतच दुसरे वैदकिय अधिकारी डॉ.आनंत चव्हाण, सहा- अधिक्षक संजय देशमुख व औषध विभाग प्रमुख मोहनराव पाटील शिंदे या सर्वांचा सुद्धा सत्कार करण्यात आला.यावेळी शिवसेना शेतकरी नेते साहेबराव पाटील भोंबे, सेना तालुका शेतकरी प्रमुख रमेश महागावकर, प्रेस व पञकार सेवा संघाचे तालुकाध्यक्ष उत्तम कसबे, व्हाइस मिडिया पत्रकार संघाचे तालुकाध्यक्ष दत्ताभाऊ बोईनवाड, शिवसेना उबाठाचे जिल्हा उप-संघटक सुभाष नाईक किनीकर, राष्ट्रवादी अजित पवार गटाचे प्रकाश बोंदीरवाड आदी होतं. हा सत्कार कार्यक्रम सेनेचे साहेबराव पाटील भोंबे व रमेश महागावकर यांनी घडवून आणला.


Post a Comment

Previous Post Next Post