प्रतिनिधी/माली पाटील
मागील तीस वर्षांपासून पत्रकारीता, सांस्कृतिक, सामाजिक, धार्मिक क्षेत्रात आपला वेगळी ओळख निर्माण करून समाज परीवर्तन करणारे ज्येष्ठ पत्रकार बाबुराव पाटील यांना नांदेड येथील आंबेडकर चळवळीत सामाजिक कार्यकर्ते आयोजक संजय निवडंगे यांनी यूगकवी वामनदादा कर्डक आणि प्रतापसिंग बोदडे यांच्या संयुक्त जयंती निमित्ताने यंदाचा "तूफानातील दिवे" पत्रकारिता पुरस्कार जाहीर केला आहे.
क्षेत्र कुठलेही असो त्यात जीव ओतून काम केलं की जिवंत पणा येतो अशीच खुणगाठ मनी बांधुन श्री.पाटिल हे मागील तिस ते चाळीस वर्षांपासून विविध क्षेत्रात उल्लेखनीय काम करीत आहेत.चित्रकार,पत्रकार, तबला वादक,कवी म्हणून ते सर्वपरिचित आहेत.मागील तीस वर्षांपासून "सकाळ" वृत्तपत्रात तालुका बातमीदार म्हणून कार्यरत आहेत. बातम्यांच्या माध्यमातून समाजातील विविध घटकांना न्याय मिळुन देण्यासाठी लिखाण केले आहे.त्यांच्या कार्याची दखल घेवून विविध सामाजिक संस्थांनी राज्य,मराठवाडा,जिल्हा स्तरीय शोध आणि विकास,उत्कृष्ट पत्रकारिता पूरस्काराने गौरव करण्यात आला आहे.नुकताच "सकाळ" वृत्तपत्र समुहाने उत्कृष्ट पत्रकारिता पुरस्कार देऊन सन्मानित केले आहे.त्या पाठोपाट नांदेड येथील आंबेडकरी चळवळीतील सामाजिक कार्यकर्ते संजय निवडंगे आयोजित युग कवी वामनदादा कर्डक व प्रतापसिंग बोदडे यांच्या संयुक्त जयंती निमित्ताने सामाजिक,पत्रकारीता क्षेत्रातील व्यक्तींचा गौरव करण्यात येणार आहे.यात प्रामुख्याने भोकर येथील जेष्ठ पत्रकार बाबुराव पाटील यांना "तुफानातील दिवे " पत्रकारिता पुरस्कार जाहीर करण्यात आला आहे.शनीवारी ( ता.२४) नांदेड येथील कुसुम सभागृहात सायंकाळी पाच वाजताच्या सुमारास मान्यवरांच्या उपस्थितीत पुरस्कार प्रदान करण्यात येणार आहे.त्यांच्या निवडीचे सर्व स्तरातून अभिनंदन केले जात आहे. बाबुराव पाटील यांना