दि. १५ ऑगस्ट या जन्मदिनी भुमिका जाहीर करण्याची शक्यता.......
∆ भोकर विधानसभा मतदारसंघातील निवडणूक उमेदवार पहाता मोठी चुरशीची होणार असल्याने यातच माजी मुख्यमंत्री तथा खासदार अशोक चव्हाण यांच्या कन्या मैदानात उतरल्याने अख्या महाराष्ट्राचे लक्ष असणार आहे. परंतु सर्व सामान्य जनतेच्या वा बहुजनांचे नेतृत्व करणारे मागील विधानसभा निवडणुकीत अवघ्या थोड्या मताने पराभव स्वीकारलेले आणि प्रस्थापितांची पळताभुई थोडी करणारे नागनाथ घिसेवाड हे भोकर विधानसभेच्या आखाड्यात यंदा दंड थोपटणार की अजुन काही करणार हे त्यांच्या जन्मदिवसाचे औचित्य साधत मतदार संघातील लोकांचा मेळावा घेऊन दि. १५ ऑगस्ट रोजी आपली भूमिका जाहीर करणार असल्याचे सांगण्यात आले.
राज्यातील विधानसभा निवडणुकीचे वारे वाहत असुन अवघे दोन महिने निवडणुकीला शिल्लक आहेत.सर्वच राजकीय पक्ष निवडणुकीच्या तयारीला लागले असून अनेक जन गुडघ्याला बाशिंग बांधून तयार बसले आहेत. अशातच मतदार संघातील गोरं गरीब,एस्सी,एसटी आणि ओबीसीचे नेतृत्व केलेले ज्यांना तीन विधानसभा निवडणुकीत अल्पशा मतांनी पराभव स्वीकारावा लागला.प्रस्थापिताच्या नाकी नऊ आणलेले व सध्या लोकांच्या ओठांवर एकच नाव असणारे नागनाथ घिसेवाड.सध्या शांत पण लोकांच्या संपर्कात राहून निवडणूकीचे चर्चा सुरू आहे.परंतु ठामपणे अजुन तरी निवडणूक आखाड्यात उतरले नाहीत. दि. १५ ऑगस्ट हा त्यांचा वाढदिवस असतो.याच वाढदिवसाचे औचित्य साधत ते आणि त्यांचे जुने अनुयायांनी शिलेदारांनी याच दिवशी मेळाव्याचे आयोजन केले आहे.या मेळाव्याच्या अध्यक्षस्थानी भाजपाचे ज्येष्ठ नेते तथा मुदखेड नगरपालिकेचे माजी नगराध्यक्ष राम चौधरी हे राहणार असल्याचे समजते. याच मेळाव्यात ते आपली भुमिका जाहीर करणार आहेत. सध्या राजकीय वातावरण पहाता प्रस्थापित लोकांच्या विरोधात मागासवर्गीय मतदार असल्याचे दिसून येते.अगर घिसेवाड उभे राहिले तर नक्की त्यांचा फायदा आहे.तसेच ओबीसी आरक्षणावरुण ओबीसी बिथरले असुन ते यंदा ते तिसर्या आघाडीच्या उमेदवारांस मतदान करण्याचा कल दिसत आहे.तसेच जनतेचा कानोसा घेतला असता यावेळेस नागनाथ घिसेवाड यांनाच मते देऊन एक वेळेस आमदार करु अशा भावना तिन्ही तालुक्यातील लोकांची सहानुभूती व भावना दिसत आहे.भोकर तालुक्यातील तरुणांची एक मोठी फळी घिसेवाडाना समर्थन करण्याच्या तयारीत आहे.तसेच विविध पक्षातील अनेक कार्यकर्त्यांचा मनसुबा यावेळेस नागनाथ घिसेवाड यांना शेवटची संधी म्हणून सहकार्य करण्याच्या भुमीकेत असण्याची शक्यता दिसुन येत आहे.त्यामुळे दि.१५ ऑगस्ट २०२४ रोजच्या भुमीकेवर लक्ष असुन ते रणांगणात कुस्ती खेळणार की,अजुन वेगळी भुमिका मांडणार हे त्याचं दिवशी कळणार आहे.सध्या तरी महाविकास आघाडी व महायुती आणि तिसरी आघाडी असा कलगीतुरा रंगणार एवढं मात्र नक्की आहे.अगर नागनाथ घिसेवाड यंदा निवडणूक लढविण्याची जाहीर केले तर मात्र प्रस्थापित राजकारण्यांना घरी बसावे लागते की काय ? अशी शक्यता मतदारसंघात व्यक्त होतांना दिसुन येत आहे.