प्रतिनिधी / माली पाटील
गरिबीचे चटके सहन करत सर्व सामान्य माणसाचे कार्य करत प्रत्येकांच्या दु:ख सुखात धावुन जात राजकारणासह समाजकारण करत असताना मात्र थोडक्यात विजयाची संधी हुकली आणि तुमच्या सारखी आमची ही तिचं गत आहे.कारण समय से पहिले और किस्मत के बाद काहीच मिळत नसतं पण तुम्ही राजकारणात तरुण आहात.सत्तेचा माजी चढलेल्या मंडळीना खाली खेचा अन् नागनाथ घिसेवाड आता भावी नाही जनतेचे आमदार म्हणून मैदानात उतरा असा वडीलकिचा सल्ला मुदखेडचे माजी नगराध्यक्ष राम चौधरी यांनी केले आहे.ते वाढदिवस समारंभाच्या अध्यक्षपदारुन बोलत होते.
भोकर येथे दि. १५ ऑगस्ट रोजी कै.लक्ष्मणराव घिसेवाड विद्यालयात बहुजनांचे तथा सर्व सामान्य जनतेचे नेते शिक्षण महर्षी नागनाथ घिसेवाड यांचा वाढदिवसा निमित्त अभिष्टचिंतन सोहळा मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला.यावेळी या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी मुदखेडचे माजी नगराध्यक्ष राम चौधरी तर प्रमुख अतिथी म्हणून ओबीसी नेते नामदेव आयलवाड, डॉ. उत्तम जाधव,गोरसेनेचे राष्ट्रीय अध्यक्ष अरुणभाऊ चव्हाण, भाजपचे वरिष्ठ नेते प्रवीण गायकवाड,शंकर मुतकलवाड, माजी उपजिल्हा प्रमुख सतीश देशमुख, तालुका प्रमुख संतोष आलेवाड,दिलीप तिवारी,चंपतराव मेंडके हे व्यासपीठावर उपस्थित होते. यावेळी शुभेच्छा देताना डॉ.यु.एल.जाधव म्हणाले सर्व सामान्य लोकांच नेतृत्व करताना मी नागनाथ घिसेवाड तालुका प्रमुख असताना त्यांच्या सोबत काम करण्याची संधी मिळाली.आणि १९९१ ला ते पक्षाचे दावेदार असताना मला संधी मिळाली अन् जिवाचं रान केले पण अल्पशा मतांनी मला पराभव स्वीकारावा लागला.गरीबी तुन पुढं आलेलं नेतृत्व म्हणजे नागनाथ घिसेवाड. या नंतर ओबीसी नेते नामदेव आयलवाड यांनी बहुजन एक होऊन आपल्या विचाराचे मानसे पाठवा असे ते म्हणाले.
*सर्व सामान्य जनतेची ताकद माझ्या पाठीशी* नागनाथ घिसेवाड
सत्काराला उत्तर देताना बहुजन नेते नागनाथ घिसेवाड
म्हणाले भोकर विधानसभा मतदार संघात मागील ३० वर्षापासून सर्वसामान्य जनतेच्या सेवेत राहून प्रस्थापितांच्या विरोधात आपण लढा दिला, बहुजन समाजाचे संघटन केले,वेगवेगळे गुन्हे दाखल करून अनेक षडयंत्र रचून मला संपवण्याचा प्रयत्न केला मात्र तेच संपले मी मात्र जनतेच्या पाठिंब्यामुळे अजूनही खंबीरपणे उभा आहे, डॉ.बाबासाहेब आंबेडकर,छत्रपती शिवाजी महाराज,महात्मा ज्योतिबा फुले यांचा विचार सोबत घेऊन माझी वाटचाल अजूनही चालू आहे, सर्वसामान्य जनतेची ताकद माझ्या पाठीशी असल्यामुळे मी सर्वांच्या सेवेसाठी तत्पर राहील असा ठाम विश्वास यावेळी बोलताना नागनाथ घीसेवाड यांनी व्यक्त केला.
या अभिष्टचिंतन सोहळ्यास उत्तम पा.हसापूरकर बालाजी खर्डे पाटील,शंकरराव अंमदुरेकर,शिवसेना तालुकाप्रमुख संतोष अलेवाड,शहर प्रमुख पांडुरंग वर्षेवार, ओबीसी नेते रामेश्वर गौड, पत्रकार एल.ए.हिरे, पत्रकार उत्तम बाबळे, पत्रकार डॉ.मनोज गिमेकर, पत्रकार अहमद भाई करखेलीकर, शिवसेनेचे जिल्हा संघटक सुभाष नाईक किनीकर, पत्रकार सिद्धार्थ जाधव, युवा नेते सुनील हंकारे,आप्पाराव राठोड, पत्रकार दत्ता बोईनवाड, पत्रकार ज्योतीताई सरपाते, प्राचार्य गणेश जाधव व शाळेतील विद्यार्थी अन् शिक्षकासह मतदार संघातील हजारो अनुयायी उपस्थित होते.यावेळी प्रस्तावना नागोराव शेंडगे बापू यांनी तर सूत्रसंचालन पत्रकार बि.आर.पांचाळ व आभार प्रा.गणेश जाधव यांनी केले.