प्रतिनिधी ्/ माली पाटील
किनवट-हदगाव-हिमायतनगर-उमरी-नांदेड-मुदखेड-अर्धापुर-देगलुर आदी तालुक्यातुन शेकडो वाहनांचा ताफा घेऊन ओबीसी बांधव भोकरकडे रवाना होत आहेत.
भोकरच्या मार्केट यार्डातील (मोंढा मैदान) परिसरात मेळाव्याची जय्यत तयारी झाली असून भव्य व्यासपीठ उभारण्यात आले आहे.या मेळाव्यास जवळपास २५ ते ३० हजार ओबीसी बांधव उपस्थित राहण्याची शक्यता वर्तवली जात आहे. या मेळाव्याची भोकर तालुक्यातील लोकांत उत्सुकता निर्माण झाली आहे.
∆ आज रविवार रोजी भोकर येथे होणाऱ्या ओबीसी आरक्षण बचाव मेळाव्याला उपस्थित राहण्यासाठी नांदेड जिल्ह्यातील विविध तालुक्यातुन शेकडो गाड्यांचा ताफा घेऊन ओबीसीचा म्होरक्या तथा योध्दा अभ्यासु विचारवंत प्रा.लक्ष्मणराव हाके पाटील यांचे परखड विचार ऐकण्यासाठी ओबीसी बांधव व सोबतच एस्सी,एसटी आदी लोक हजारोंच्या संख्येने या कार्यक्रमास उपस्थित राहणार आहेत.
ओबीसी आरक्षणाच्या ताटात कोणाचा ही हिस्सा नको.कारण त्या ताटातील ओबीसीचे पोट भरत नाही अन् त्यावर दुसरे हक्क सांगत आहेत.त्यामुळे ओबीसींच्या ताटाऐवजी स्वतःचे स्वतंत्र ताट घ्यावे यासाठी ओबीसी आरक्षणावर गदा येऊ नये म्हणून भोकर तालुका ओबीसी बांधवांच्या वतीने दि.१८ ऑगस्ट २०२४ रोज रविवारी आज मोंढा मैदान भोकर येथे ठिक ११ वाजता ओबीसी आरक्षण बचाव मेळाव्याच आयोजित केले आहे. या मेळाव्याला मार्गदर्शन करण्यासाठी मागासवर्गीय आयोगाचे माजी सदस्य तथा ओबीसीचा म्होरक्या प्रा. लक्ष्मण पा.हाके व नवनाथ वाघमारे सह अनेक मंडळी उपस्थित राहणार आहेत.यासाठी आज होणार्या या मेळाव्याची जय्यत तयारी करण्यात आली असून शहरभर पिवळे झेंडे, जागोजागी बॅनर लावण्यात आले आहेत. संपुर्ण भोकर ओबीसीमय झाले असल्याचे दिसून येते.या मेळाव्यास किनवट, हदगाव, हिमायतनगर, मुदखेड, अर्धापूर, नांदेड,उमरी,बिलोली,मुखेड आदी तालुक्यातुन शेकडो वाहनांचा ताफा घेऊन ओबीसी येत आहेत. यामुळे भोकर तालुक्यातील तमाम ओबीसी बांधव व एस्सी, एसटी सहीत मुस्लिम बांधव ही मोठ्या प्रमाणात उपस्थित राहुन आपले आरक्षण वाचवावे असे आवाहन ओबीसी नेते नामदेव आयलवाड, आदिवासी नेते नागनाथ घिसेवाड, धनगर नेते नागोराव शेंडगे बापू, माधव अमृतवाड,सतीष देशमुख, संदीप गौड कोंडलवाड,बि.आर.पांचाळ, अँड. परमेश्वर पांचाळ, अँड.शेखर कुंटे, अंबादास अटपलवाड, सुरेश बिल्लेवाड, सुभाष नाईक किनीकर, संतोष अणेराये, निळकंठ वर्षेवार, संतोष आलेवाड, नागोराव बिरगाळे, अप्पाराव राठोड, तोटावाड सर,आनंद डांगे,