भोकर तालुक्यातील किनी व समंदरवाडी येथील आत्महत्या ग्रस्त शेतकऱ्यांना उद्योजक दादाराव ढगे पाटील यांच्याकडून आर्थिक मदत

 


                     प्रतिनिधी / माली पाटील 

∆ जे जे आपणासी जमेल ते ते सर्व सामान्य दु:की लोकांना साहाय्य करत भोकर तालुक्यातील आत्महत्या ग्रस्त शेतकऱ्यांना काँग्रेस नेते दादाराव ढगे पाटील यांच्या कडून आर्थिक केली जात असुन किनी येथील स्व्.नरेशरेड्डी कुंटलवाड या तरुणांच्या कुटुंबास व समंदरवाडी येथील हिरामण माझळकर यांना प्रत्येकी ५१-५१ हजार रुपयांची मदत दिली आहे.

  भोकर विधानसभा मतदारसंघातुन काँग्रेस पक्षाच्या तिकिटावर निवडणुक लढवण्याच्या तयारीत असलेल्या कु.दामीनी ढगे यांचे वडील उद्योजक दादाराव पा.ढगे यांनी मतदारसंघातील आत्महत्या केलेल्या आणि वीज पडुन मृत्यू पावलेल्या कुटुंबीयांना आर्थिक मदतीचा हात देत दिलासा देत आहेत. दि.५ आॅगष्ट रोजी किनी येथे जाऊन कर्जाला कंटाळून नरेशरेड्डी कुंटलवाड वय ३६ वर्षे या तरुणाने आत्महत्या केली असल्याने त्या कुटुंबाला दादाराव ढगे यांनी ५१ हजार रुपयांची आर्थिक मदत केली आहे.यावेळी सरपंच प्रतिनिधी भुमारेड्डी गडमवाड,माजी सरपंच त्रिपतरेड्डी मुत्यालवाड, काँग्रेसचे युवा अध्यक्ष रविंद्र रेड्डी बोंतलवाड,नरेशरेड्डी कासारेड्डी,नरसिंहरेड्डी मुत्यालवाड माली पाटील पंजाबराव नाईक आदी उपस्थित होते. 

तसेच कर्जबाजारी होऊन आत्महत्या केलेल्या समंदरवाडी येथील शेतकरी हिरामण माझळकर यांच्या कुटुंबीयांना ही दादाराव ढगे यांनी ५१ हजार रुपयांची आर्थिक मदत केली आहे.यावेळी माजी सरपंच माधवराव दामाजी माझळकर, मारोतराव वाकदकर,अरुण खुपसे,नाईक आदी उपस्थित होते. सर्व सामान्य लोकांच्या दु:खात सहभागी होऊन फुल नाही फुलांची पाकळी म्हणून देत असल्याचे उद्योजक दादाराव ढगे पाटील यांनी सांगितले.




Post a Comment

Previous Post Next Post