प्रतिनिधी / माली पाटील
राज्यातील महिलांचे आर्थिक सक्षमीकरण तसेच त्यांचे जीवन उंचावण्याचे काम करत लगे " मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण " योजना यासह अनेक योजना महायुती सरकारकडून राबविण्यात येत असून महिलांना सक्षम बनविण्याचे काम हे सरकार करीत असल्याचे मत राज्याच्या महिला व बालविकास मंत्री अदिती तटकरे यांनी भोकर येथील महिला संवाद मेळावा व युवक मेळाव्यात बोलताना केले.
भोकर येथे राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाचे जिल्हाध्यक्ष इंजि.विश्वंभर पवार यांच्या पुढाकारातून महिला संवाद मेळावा व युवक मेळाव्याचे आयोजन दि.७ ऑगस्ट रोजी मोंढा मैदानातील लिलाव शेडमध्ये करण्यात आले होते. यावेळी प्रारंभी दीप प्रज्वलन करून मान्यवरांचा सत्कार करण्यात आला. यात प्रदेश युवक अध्यक्ष सुरेश चव्हाण, प्रदेश चिटणीस रणजित नरोटे, जिल्हा उपाध्यक्ष ईसाखान आदी व्यासपीठावर उपस्थित होते.प्रास्ताविक राॅका तालुका अध्यक्ष राजेश कदम यांनी केले. आपले मनोगत व्यक्त करताना जिल्हाध्यक्ष इंजि. विश्वंभर पवार बोलताना म्हणाले की, राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष अजित पवार गट जिल्ह्यासह तालुक्यात सक्षमपणे काम करत असून युवकांची मजबूत फळी निर्माण करण्यात आली आहे. पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष अजित दादा पवार यांचे हात बळकट करण्यासाठी आपण आणखी जोमाने काम करू असे मनोगत व्यक्त केले.
राष्ट्रवादी काँग्रेसचे युवक प्रदेश अध्यक्ष सुरज चव्हाण यांनी पक्षाचे भूमिका विशद करताना म्हणाले की, राष्ट्रीय अध्यक्ष तथा उपमुख्यमंत्री अजित दादा पवार यांच्या नेतृत्वात पूर्ण महाराष्ट्र भर पक्ष जोमाने काम करत आहे. जनतेची कामे चांगल्या प्रकारे होत असल्याचे मत मांडले.यानंतर महिला व बालविकास मंत्री अदिती ताई तटकरे यांनी उपस्थित जनसमुदायाला संबंधित करताना म्हणाल्या की, जिल्ह्यात राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे काम भोकर तालुक्यात उत्तम असुन भोकर मध्ये महिला संवाद व युवक मेळाव्याच्या आयोजनाचे सत्र चांगल्या प्रकारे आयोजित करण्यात आले असून राज्यातील महिलेला सक्षम करण्यासाठी युती सरकारकडुन " मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना " ही मोठ्या धुमधडाक्यात राबविण्यात येत असुन महिलनी मोठ्या संख्येने यात सहभागी होऊन यांचा लाभ घ्यावा तेम्हणत राज्यात २.५० लाख अर्ज प्राप्त झाले असून आणखी अर्ज येण्यावरच आहेत. आपल्या भोकर तालुक्यात २१ हजार ८५२ अर्ज आले असून यातील १८००० अर्जांना मंजुरीही देण्यात आली. रक्षाबंधनाच्या मुहूर्तावर महायुती सरकार भावाकडून लाडक्या बहिणीचे ओवाळणी करणार आहे. प्रत्येकाच्या खात्यात पैसे पडतील. विशेष करून महिलांच्या वैयक्तिक खात्यात पैसे जाणार आहेत. यासोबतच मुख्यमंत्री व दोन उपमुख्यमंत्री यांनी लाडक्या बहिणी बरोबरच लाडक्या भावासाठी सुद्धा योजना सुरू करण्यात आली आहे. महिलांना अधिकाधिक सक्षम बनविण्याचे काम महायुती सरकार करीत आहे. युवकांसाठी प्रशिक्षण सुद्धा देण्यात येत आहे. असे सांगून अंगणवाडी सेविकांच्या मागण्याचा विचारा शासनाकडून चालू आहे. त्यांचे मानधन व इतर मागण्या याबाबत सुद्धा सरकार सकारात्मक विचार करीत आहे, असेही त्या शेवटी म्हणाल्या.हे कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी जिल्हाध्यक्ष इंजी. विश्वंभर पवार, तालुका अध्यक्ष राजु कदम, कन्हैया कदम, सचिन जाधव, ओबीसी जिल्हा अध्यक्ष आनंद डांगे, माधव देशमुख, आनंद शिंदीकर, रवी गेन्टेंवार, पंकज देशमुख, दर्शन डुरे, सिद्धू चिंचाळकर, फय्यूम पटेल, महेंद्र कांबळे,मझरोउद्दीन, बालाजी पाटील, नामदेव वाघमारे, चेतन पाटील, सतीश चटलावार, प्रकाश बोंदीरवाड, गजू सोळंके, निलेश खांडरे, संजीव नरवाडे, साहेबराव वाहुळकर, बाळासाहेब नांदेकर आदीसह राष्ट्रवादी काँग्रेसचे कार्यकर्ते महिला व युवक उपस्थित होते.कार्यक्रमाचे सुत्रसंचलन गायकवाड सर यांनी केले.