प्रतिनिधी/माली पाटील
∆ भोकर तालुक्यातील मौजे रेणापुर येथील नदी पात्राच्या प्रवाहातुन शेतीकडे गेलेलले दोन युवक वाहुन गेल्याची घटना दिड तासांपूर्वी घडली आहे.
गत तिन दिवसांपासून भोकर तालुक्यांत पाऊस बरसत आहे.या पावसामुळे सुधा प्रकल्प भरुन जाऊन ओव्हर फुल झाला आहे. अशातच आज दि.३ सप्टेंबर रोजी दुपारी दीड ते दोन वाजण्याच्या सुमारास मौजे रेणापुर येथील श्रीनिवास भरत मुळेकर वय १९ वर्षं व यश भगत वय २० वर्ष रा.रेणापुर हे वाहत्या पाण्याचा पात्रातुन शेतीकडे जात असताना पाण्याचा प्रवाह वाढल्याने तते पाण्यात वाहून गेल्याचे समजते. .