प्रतिनिधी/ माली पाटील
पिक विमा व नुकसान भरपाई कुठली ही अट न लावता त्वरीत आर्थिक मदत करा- शिवसेना उध्दव बाळासाहेब ठाकरे पक्षाची मागणी (किनी-पाळज सर्कल)
∆ सप्टेंबर महिन्याची सुरुवात मुसळधार पावसाने सुरू झाली असुन यावर्षी आजपर्यंत न पडला तेवढा मुसळधार पाऊस बरसला असल्याने भोकर तालुक्यातील किनी मंडळात सर्वाधिक मुसळधार पावसाची नोंद झाली असून या पावसामुळे शेती व पिकांचे प्रचंड नुकसान झाले आहे.प्रशासनाने वेळ न दवडता नुकसान झालेल्या शेतीचे पंचनामे करून व पिक विमासाठी कोणती ही अट न लावता थेट नुकसानभरपाई देण्यात यावी अशी मागणी शिवसेना उध्दव बाळासाहेब ठाकरे पक्षाकडून करण्यात आली आहे.
भोकर तालुक्यात गेल्या चार दिवसापासून पाऊस चालू असून दि.३१ ऑगस्ट च्या मध्यरात्रीपासून सुरू झालेल्या अतिवृष्टी पावसामुळे अनेक नदी, नाले, ओढे भरभरून वाहत आहेत. या पावसामुळे किनी परिसर मंडळात सर्व जमिनी पाण्याखाली गेल्याने शेतकऱ्याच्या शेतातील सोयाबीन, कापूस, हळद,ज्वारी, मुग, उडीद इतर पिकाचे अतोनात नुकसान झाले आहे. किनी, पाळज, भुरभुरशी,पाकी, आमठाणा,नेकली,महागाव, दिवशी खू. दिवशी बु,गारगोटवाडी,कोळगाव खू. नांदा बु, कोळगाव बु रेणापूर,देवठाणा,मसलगाव,सोमठाणा,सावरगाव माळ धावरी बु. थेरबन आदी गावात पावसामुळे शेतकऱ्याच्या हाताला आलेले पीक गेल्यामुळे शेतकरी आ्स्मानी संकटात सापडला आहे. तालुक्यात किनी मंडळात सर्वाधिक ९५.५ मी मी एवढ्या पावसाची नोंद झाली आहे. त्यामुळे सर्वाधिक नुकसान याच मंडळात झाले आहे. तसेच ७२ तासांमध्ये झालेल्या नुकसानीची ऑनलाईन नोंद करण्याचे प्रशासन सांगत आहे. परंतु ऑनलाईन साईट व्यवस्थित चालत नाही. सर्वच शेतकऱ्याकडे अँड्रॉइड मोबाईल नाहीत. मग शासनाच्या या सांगण्याला काय अर्थ ? एवढा अतिवृष्टीचा पाऊस झाला हे डोळ्याने दिसत असताना मग ऑनलाईन नोंद करण्याची काय गरज. शेतकऱ्यांना पिक विमा सरसकट का देता येत नाही. फक्त विमा कंपन्या व सरकारच्या दलालीसाठीच असे खोडा घालत आहात काय ? शेतकऱ्याची परिस्थिती लक्षात घेऊन पिक नुकसानीचे पंचनामे करून त्याप्रमाणे आर्थिक नुकसान व पिक विमा शेतकऱ्यांना सरसकट देण्यात यावे अशी मागणी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे जिल्हा संघटक सुभाष नाईक किनीकर, तालुका संघटक नंदू पाटील, ज्ञानेश्वर पाटील,चेअरमन गंगाधर महादवाड, साईनाथ आसरवाड, जेष्ठ शिवसैनिक गंगाधर तुराटिकर, माजी सरपंच मनोहर साखरे, तानाजी जाधव, माजी जि.प. सदस्य सुनील चव्हाण, लक्ष्मण दादा कोरडे, सायारेड्डी प्रेमयगार, गणेश आटाळकर, साईनाथ गादेपवाड, रमेश कोकणे, मारुती पवार, संजय चिकटे, भुजंग पा. मांजरे, मुन्ना पा. गायकवाड, साहेब वाकोडे, चेअरमन गजानन हाके, साहेबराव पा. रेनापुरकर, आनंद नलुरवाड, वसंत लखा जाधव, नविनरेड्डी पाकीकर आदींनी शासनाकडे केली आहे.