∆ भोकर तालुक्यात सतत तीन दिवस मुसळधार व अतिवृष्टी चा पाऊस होऊन यात शेती पाण्याखाली येऊन पिकांचे मोठे नुकसान होऊन खरीप हंगामातील पीक शेतकऱ्यांच्या हातून गेल्याने बळीराजा संकटात सापडले आहेत.त्यामुळे शेतकऱ्यांना पिक विमा सहित झालेल्या नुकसान भरपाईचे हेक्टरी ५० हजार आर्थिक अनुदान त्वरित शेतकऱ्यांना दिलासा द्यावा असी मागणी भोकर तालुका शिवसेना उध्दव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या वतीने एका निवेदनाद्वारे तहसीलदाराकडे केली आहे.
तहसीलदार भोकर यांना दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की, भोकर तालुक्यात सप्टेंबर महिन्याच्या सुरुवाती पासूनच पावसाला सुरुवात झाली असून तीन दिवस पडलेल्या मुसळधार पावसामुळे नदी,नाले व तलाव ओव्हर फुल होऊन वाहु लागले तर या मुसळधार पावसामुळे शेतीचे प्रचंड नुकसान झाले आहे.तालुक्यातील सर्व शेती पाण्याखाली येऊन शेतात उभे असलेले पिक यात कापूस, सोयाबीन,हळद,उडीद मूग,तुर आदी पिके यामुळे वाया गेले असल्याने शेतकऱ्यांवर मोठे आर्थिक संकट कोसळले आहे. या पावसामुळे खरीप हंगाम पुरता वाया गेल्याने शेतकऱ्याचे कंबरडे मोडले आहे.त्यामुळे या शेतकऱ्यांना धीर द्यावे यासाठी शासनाने पंचनामे न करता पिक विमा व नुकसान भरपाई असी हेक्टरी पन्नास हजार रुपये आर्थिक अनुदान देऊन शेतकऱ्यांना दिलासा द्यावा.असे शिवसेनेच्या वतीने म्हटले आहे. या निवेदनावर तालुका प्रमुख संतोष आलेवाड, जिल्हा समन्वयक अँड. परमेश्वर पांचाळ,परमेश्वर , उप-जिल्हा संघटक सुभाष नाईक किनीकर , मा.उपजिल्हा प्रमुख तथा कृ.उ.बा.स.संचालक सतीश देशमुख, शहर प्रमुख पांडुरंग वर्षेवार , तालुका संघटक नंदू पा. कवठेकर, किसान सेना तालुका प्रमुख साहेबराव पा.भोंबे, शहर संघटक राहुल कोंडलवार, माजी शहर प्रमुख माधव बिल्लेवाड, माजी उप तालुका प्रमुख मारुती पवार, सूर्यकांत पिंगलवाड, सर्कल प्रमुख गोविंद गिरी, विशाल बुद्धेवाड, रमेश पोलकमवार, मनोहर साखरे, तानाजी जाधव, वामन पर्वत, नरसिंग वर्षे वार, गण प्रमुख रामदास कोटावाड, मानेजी भालेराव यांच्या स्वाक्षऱ्या आहेत.