प्रतिनिधी / माली पाटील
∆ बंजारा समाजाची दिशाभूल करत विकासाची आस दाखवून मत घेणे आता समाज दउधखउळआ राहीला नसुन आमच्या समाजाचे दैवत असलेल्या संतांचा अपमान करणार्यांना आता मतदार धडा शिकवणार असुन या भोकर विधानसभेत प्रस्थापिताना धोबीपछाड देत विजय खेचून आणणार असल्याचे प्रतिपादन वंचित बहुजन आघाडीचे उमेदवार रमेश राठोड यांनी पत्रकार परिषदेत बोलताना सांगितले.
वंचित बहुजन आघाडी पक्षाच्या वतीने दि. २३ ऑक्टोबर रोजी बाॅयपास रोडवरील ओम लाॅंस मंगल कार्यालयात पत्रकार परिषदेचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी वंचित बहुजन आघाडीचे जाहीर झालेले उमेदवार रमेश राठोड यांनी उमेदवार म्हणून पत्रकार परिषदेत विचार मांडताना म्हणाले की, श्रद्धेय बाळासाहेब आंबेडकर यांनी भोकर विधानसभा मतदारसंघासाठी माझी उमेदवारी जाहीर केली.भोकर विधानसभेत विकास झाला म्हणतात पण विकास कोठे दिसेना झाला.या भागाचे आमदार हे भोकर शहरात बंजारा समाजाच्या संतांच्या स्मारकासाठी जागा दिली पण ती जागा वादग्रस्त असुन समाजाची दिशाभूल करत मतांच्या जोगव्यासाठी धडपड चालू आहे.पण बंजारा समाज आता दुधखुळा राहीला नाही.ते विधानसभेत कळेल.आज ओबीसींच्या आरक्षणावर गदा आली असुन यामुळे ओबीसी समाज प्रस्थापित लोकांच्या विरोधात असुन याला एस्सी,एसटी समाज ही जोडीला आहे.आजपर्यत एम आय डी सीचा प्रश्न मार्गी लागला नाही. भोकर मतदार संघातील जनता माझी खरी शक्ती आणि धन दौलत असून यांच्या बाळावर च मी उभा आहे. माझी नाळ भोकरशी जोडलेली आहे. भोकर तालुक्यातुन मी जी.प.सदस्य म्हणून कार्य केले त्यामुळे माझा विजय निश्चित असून भोकर मतदार संघातील जनता आता निवडणुकीच्या तोंडावर नारळ फोडणाऱ्या लोकांना जनता जागा दाखवून देणार आहे. असे ते म्हणाले. या पत्रकार परिषदेत जिल्हा अध्यक्ष राजेश्वर हत्ती आंबिरे पालमकर, सुरेश राठोड, तालुका अध्यक्ष दिलीप राव, माजी तालुका अध्यक्ष सुभाष तेले, मोहन कांबळे, मोरे ,अशोक राठोड आदी उपस्थित होते.