माजी मुख्यमंत्र्यांना त्यांनीच घडवलेल्या कार्यकर्ते विरुध्द लढण्याची पाळी
∆ महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीत सर्वच पक्षांचे उमेदवार जवळपास जाहीर झाले असून भोकर विधानसभा मतदारसंघात मात्र ज्यांच्या नेतृत्वात कार्यकर्ता घडला त्याच कार्यकर्त्यांसी सामना करण्याची वेळ माजी मुख्यमंत्री तथा राज्यसभा खा.अशोक चव्हाणापुढे आली असून आता धनदांडगे विरुध्द सर्व सामान्य कार्यकर्ता असी लढत भोकर विधानसभा मतदारसंघात रंगणार आहे.
भोकर विधानसभा मतदारसंघ -२०२४ निवडणुक रंगतदार होणार असुन या विधानसभेत महायुतीतील भाजप उमेदवार म्हणून श्रीजया चव्हाण यांची उमेदवारी जाहीर झाली.तर महाविकास आघाडीत ही जागा काँग्रेस पक्षाला असल्याने येथे १४ उमेदवार इच्छुक होते.परंतु या ठिकाणी बाळासाहेब रावनगावकर, दामीनी ढगे, गोविंद पाटील यांनी बराच जोर लावला परंतु काँग्रेस पक्ष श्रेष्ठी मात्र पप्पू पा. कोंढेकर यांना उमेदवारी जाहीर केली आहे.त्यामुळे यातील काही इच्छुक नाराज झाले आहेत. आता श्रीजया चव्हाण यांना त्यांच्याच कार्यप्रणाली खाली कार्य करणाऱ्या सर्व सामान्य कार्यकर्ता असलेल्या काँग्रेस उमेदवार पप्पू पा.कोढेंकर यांच्या सोबत लढावे लागणार आहे.यात वरकरणी पाहता जरी श्रीजया यांचं पार्ड जरी वाटत असलं तरी लढाई मात्र तेवढी सोपी नाही. महा विकास आघाडीला मतदारसंघात काही न सांगता येणारी एकगठ्ठा मते आहेत.एदा कदाचीत यामुळे भाजप पक्षाला पराभवाचा सामना करावा लागेल अशी शक्यता आहे. त्यातच शिवसेना उध्दव बाळासाहेब ठाकरे पक्ष व शरदचंद्र पवार राष्ट्रवादी काँग्रेस यांची भक्कम साथ यामुळे चित्र वेगळे दिसण्याची शक्यता आहे.सोबतच वंचित बहुजन आघाडी, ओबीसी हाक्के समर्थक उमेदवार, ओबीसी बहुजन आघाडी,रासपा व बलाढ्य अपक्ष उमेदवार यांचा ही मतदारांवर भारी पगडा असल्याने चव्हाण कुटुंबीयाची एका अर्थाने सत्व परीक्षाच होणार आहे.खरे चित्र दि.३ नोव्हेंबर रोजी कळेल.