प्रतिनिधी /माली पाटील
∆ संपुर्ण मराठवाड्याचे लक्ष लागून असलेल्या भोकर विधानसभा मतदारसंघात राजकीय हालचालीला वेग येत असुन कुठल्याही परिस्थितीत भाजपच्या उमेदवारांचा पराभव करायचाच म्हणून मतदार संघातील मातब्बर मंडळी एकत्र येऊन गुपीत बैठका घेत असल्याने या मतदारसंघात वेगळा निकाल दिसुन येईल का किंवा खेला होईल का ? हे पहाणे औत्सुक्याचे दिसेल.
भोकर विधानसभा -८५ मतदारसंघासाठी महाविकास आघाडी व महायुती या आघाडीच्या उमेदवारांची उमेदवारी घोषित करण्यात आली आहे.तसेच वंचित बहुजन आघाडी, राष्ट्रीय समाज पक्ष आदी पक्षाच्या उमेदवारांची उमेदवारी जाहीर झाली आहे.परंतु यातील काही पक्षातील इच्छुकांना उमेदवारी न मिळाल्याने नाराज असुन यातील काही जण व एक बलाढ्य उमेदवार अपक्ष म्हणून उमेदवारी भरणार असल्याचे समजते.तसेच तिन टर्म विधानसभा लढवलेले मातब्बर लोकनेते नागनाथराव
घिसेवाड, ओबीसी नेते नामदेव आयलवाड, सतीष देशमुख दामीनी ढगे पाटील सह इतर अनेक जण उमेदवारी अर्ज दाखल करणार असल्याचे समजते.भोकर विधानसभा मतदारसंघात माजी मुख्यमंत्री यांची कन्या उभी असल्याने या मतदार संघाकडे सर्वांचेच लक्ष लागुन असल्याने माजी मुख्यमंत्री कसलीच तसदी सोडत नसल्याचे दिसून येत आहे.प्रत्येक समाजाच्या कार्यकर्त्यांची टीम करुन त्या त्या समाजाला गोंजरण्याचे काम गावोगावी होताना दिसुन येत आहे.आपल्या वारसाला पुढे आणण्यासाठी अख्य चव्हाण कुटुंब प्रयत्न करत आहे. माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांनी मतदार संघात मोठ्या प्रमाणावर विकास केला.असे जरी असले तरी पक्षबदलीमुळे,मराठा,धनगर आरक्षण व ओबीसी आरक्षणासाठी दुर्लक्ष यामुळे जनता मात्र त्यांच्या विरोधात असल्याचे दिसते.त्यामुळे सर्व चव्हाण विरोधक दि.२६ रोजी एक गुपित बैठक घेऊन एकच सक्षम व बलाढ्य पर्यायी उमेदवार देण्याविषयी चर्चा झाली असून कोणत्याही परिस्थितीत भाजप उमेदवाराचा पाडाव करुन चव्हाणांना घेरण्याचा ठरलं असल्याची खात्रीलायक माहिती आहे.यामुळे भोकर विधानसभेत अपक्षांचा तगडा उमेदवार उभा करण्याच्या हालचाली सुरू झाल्या असल्याने निवडणूक मात्र रंगतदार होणार असल्याचे चित्र दिसत आहे.विरोधक तर म्हणत आहेत की खेला तो होगा ! बघु काय घडतंय ते.