प्रतिनिधी /माली पाटील
भोकर -भोकर शहरातील उडान पुलावर एका मालवाहू ट्रकने दुचाकी ला जोराची धडक दिल्याने दुचाकी स्वार जागीच मृत्यू पावल्याची घटना दिनांक 26 नोव्हेंबर रोज मंगळवारी रात्री आठ वाजण्याच्या सुमारास उडान पुलाच्या मध्ये ठिकाणी घडली आहे.
भोकर शहरातून गेलेला उड्डाणपूल हा अरुंद असल्याने वाहनधारकांना अडखळत चालवत जावे लागत आहे. अशातच दिनांक २६ नोव्हेंबर रोजी मंगळवारी सायंकाळी आठ वाजण्याच्या सुमारास उडान पुलाच्या मध्यभागी नांदेडहून येणाऱ्या मालवाहतूक क्रमांक एम एच ४० सीडी ३४३१ समोरील दुचाकीस क्रमांक एम एच २६ बी ३८६८ जोराची धडक दिल्याने त्या त्याचा की स्वाराचा जागीच मृत्यू झाला. या घडलेल्या घटनेची माहिती भोकर पोलिसांना मिळताच भोकर ठाण्याचे पोलीस निरीक्षक अजित कुंभार यांनी ट्रक ताब्यात घेत अपघातात मृत्यू पडलेल्या व्यक्तीस ग्रामीण रुग्णालयात पाठविले. सदरील मृत्य युवकाचे नाव बालाजी पुरभाजी गोरे वय ३४ वर्ष राहणार शेलगाव तालुका अर्धापूर येथील असल्याचे कळते .सदरील घटनेचा तपास पोलीस निरीक्षक अजित कुंभार यांच्या मार्गदर्शनाखाली जमादार जाधव हे करीत आहेत.