प्रतिनिधी / माली पाटील
लोकशाही पद्धतीने झालेल्या निवडणुकीत अध्यक्ष म्हणून -दत्ता बोईनवाड उपाध्यक्ष-सुरेशसिंह चौधरी. तर सचिवपदी -अनिल कर्हाळे यांची निवड
∆ लोकशाहीचे मुल्य जपत व्हाईस ऑफ मीडियाचे संस्थापक अध्यक्ष संदीप काळे यांच्या मार्गदर्शन आदेशानुसार भोकर तालुका व्हाईस ऑफ मीडिया या पत्रकार संघटनेची कार्य कारिणी निवडणूक संपन्न झाली असुन तालुका अध्यक्ष म्हणून दत्ता बोईनवाड यांची तर उपाध्यक्षपदी सुरेशसिंह चौधरी यांच्या सहित तालुका कार्यकारिणीची निवड लोक शाहि पद्धतीने हात उंचावून करण्यात आली आहे.
व्हाईस ऑफ मीडियाचे संस्थापक अध्यक्ष संदीप काळे यांच्या मार्गदर्शन आदेशानुसार नांदेड जिल्हा अध्यक्ष डॉ.गणेश जोशी, जेष्ठ पत्रकार सुनील जोशी, जेष्ठ पत्रकार तुकाराम सावंत , पत्रकार ज्योती सरपाते यांच्या उपस्थितीत भोकर तालुका व्हाईस ऑफ मीडिया कार्यकारिणीची निवडणुक लोकशाही पद्धतीने भोकर येथील शासकीय विश्रामगृहात दि.२९ नोव्हेंबर रोजी ठिक ३ वाजता घेण्यात आली.यावेळी मतदान रुपातुन हात उंचावून तालुका अध्यक्ष म्हणून दै.हिंदुसम्राटचे प्रतिनिधी दत्ता बोईनवाड यांची उपाध्यक्ष म्हणून दै.वाचक मंचचे प्रतिनिधी सुरेशसिंह चौधरी तर सचिवपदी दैनिक देशोन्नतीचे अनील कर्हाळे यांची निवड करण्यात आली आहे.सोबतच सहसचिव - गोविंद राऊतवाड, संघटक- गंगाधर मानेबोईनवाड, कोषाध्यक्ष- बि.प्रकाश तर सल्लागार - माली पाटील, ज्योती सरपाते, विठ्ठल बक्कावाड, गोविंद सुर्यवंशी, गोविंद गिरी आदीची कार्यकारिणी जाहीर करण्यात आली आहे.यावेळी नुतन पदाधिकाऱ्यांचे जिल्हा अध्यक्ष डॉ.गणेश जोशी, सुनील जोशी, तुकाराम सावंत यांनी शाल श्रीफळ पुष्पगुच्छ देऊन सत्कार केला.यावेळी मान्यवरांचे मार्गदर्शन होऊन यात संघटना वाढीसाठी प्रयत्न व सामाजिक कार्य करण्याचे आवाहन केले आहे.कार्यक्रमाचे सुत्रसंचलन सुभाष नाईक किनीकर (माली पाटील) यांनी तर आभार अनिल कर्हाळे यांनी केले.सदरील निवडणूक खेळीमेळीच्या वातावरणात संपन्न झाली.