प्रतिनिधी / माली पाटील
∆ मराठा साम्राज्याच्या पेशव्यांनी व संस्थांनी इंग्रजासमोर गुडघे टेकत असताना ब्रिटीशांना न जुमानता इंग्रजांविरुद्ध तब्बल अठरा लढया करत एकही लढाई न मारता मध्ययुगीन काळात शेवटचा सर्वात मोठा सम्राट म्हणून छत्रपती यशवंतराव होळकर नावारुपाला आले असे प्रतिपादन ज्येष्ठ नेते नागोराव शेंडगे बापु यांनी केले.
भोकर येथील भोकर रुरल फार्मस प्रोडुसर कंपनी ली,च्या कार्यालयात महानायक, महाराजा छत्रपती यशवंतराव होळकर यांची जयंती कार्यक्रम आयोजित करण्यात आला.या वेळी राजा छत्रपती यशवंतराव होळकर यांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले.यावेळी जेष्ठ नेते नागोराव शेंडगे बापु यांनी बोलताना म्हणाले कि, ब्रिटिशांना सळो की पळो करुन त्यांच्या सैन्यात भागो मल्हार आया,भागो मल्हार आया अशी दहशत निर्माण असलेल्या ६ जानेवारी १८०५ सांगली राज्यभिषेक करुन त्यांनी मराठा होळकर साम्राज्याची स्थापना केली.ते पहिले महाराजा झाले.यशवंतराव यांनी आपली पहिली चुणुक खर्ड्याच्या निजामाविरुद्ध झालेल्या युद्धात दाखवून दिली.
या कार्यक्रमास शिवसेनेचे जिल्हा संघटक सुभाष नाईक किनीकर,व्यंकट वाडेकर, राष्ट्रवादीचे प्रकाश बोंदीरवाड, व्हाॅईस ऑफ मिडीया जिल्हा संघटक ज्योती सरपाते, खंडेराव शेंडगे, निलेश चिकाळकर, व्हाॅईस ऑफ मिडीया भोकरचे उपाध्यक्ष सुरेश सिंह चौधरी, पत्रकार विजय मोरे, जगदीश पप्पुलवाड, अध्यक्ष विठ्ठल देवड,बालाप्रसाद शेंडगे, संतोष कर्पे सालेगावे, दिनेश सालेगावे, स्वरूप वानोळे आदी उपस्थित होते.