प्रतिनिधी / बि. प्रकाश
∆ नुकतेच लोकशाही मार्गाने निवडणूक झालेल्या व्हाईस आफ मिडीया नांदेडच्या जिल्हा संघटक पदी निवड झालेल्या झुंजार पत्रकार ज्योती सरपाते यांचा सत्कार पत्रकारांच्या वतीने करण्यात आला आहे.
व्हॉइस ऑफ मिडीया नांदेड जिल्हा कार्यकारिणीची निवडणूक नुकतीच संपन्न झाली.या निवडणुकीतील एकमेव महिलेच्या जागेवर भोकर तालुक्यातील भोसी येथील पत्रकार ज्योती सरपाते ह्या निवडुण आल्या असल्याने दि.३ डिसेंबर रोजी भोकर रुरल फार्मस प्रोडुसर कंपनी ली, कार्यालयात पत्रकारांच्या वतीने सत्कार करण्यात आला आहे.यावेळी जेष्ठ सामाजिक नेते नागोराव शेंडगे बापु यांच्या हस्ते शाल, श्रीफळ पुष्पगुच्छ देऊन सत्कार करण्यात आला. यावेळी शिवसेनेचे जिल्हा उ संघटक तथा रोखठोक प्रतिनिधी सुभाष नाईक किनीकर, शिवसेना दिव्यांग सेनेचे विठ्ठल देवड, बि.प्रकाश, विजय पा.सलगरे आदी उपस्थित होते.