माळेगाव यात्रेत डॉ.शंकरराव चव्हाण कृषी प्रदर्शन उद्घाटन प्रित्यर्थ
प्रतिनिधी / माली पाटील
∆ नांदेड जिल्ह्यातील माळेगाव येथे होणारी यात्रा ही महाराष्ट्रातील पारंपरिक मोठी यात्रा या यात्रेत नांदेड जिल्हा परिषद कृषी विभागाच्या वतीने देण्यात येणारे डॉ.शंकरराव चव्हाण कृषी प्रदर्शन निमित्ताने शेती पिक उत्पादनात उत्कृष्ट कार्य करणाऱ्या शेतकऱ्यांचा सन्मान करण्यात आला.यात भोकर रूरल फार्मस प्रोडुसर कंपनीचे संचालक व्यंकट हामंद यांचा कृषी निष्ठ शेतकरी म्हणून आ.प्रताप पाटील चिखलीकर व सिईओ यांच्या हस्ते सपत्नीक शाल श्रीफळ फेटा व मान चिन्ह देऊन गौरविण्यात आला.
तिने वर्षांचा ईतीहास असलेली दक्षिण भारतातील सर्वात मोठी यात्रा म्हणून माळेगावची यात्रा, या यात्रेत राज्यातील यात्री सोबत ईतर तिन राज्यातील लाखो भाविक यात्री बेल भंडारा उधळत 'यळकोट यळकोट जय मल्हार' म्हणत येत असतात.या यात्रेत कृषी व पशुप्रदर्शन कृषीनिष्ठ शेतकऱ्याचा सत्कार अश्व स्वान कुक्कुटप्रदर्शन व विविध स्पर्धा कुस्त्यांची दंगल पारंपारिक लोककला महोत्सव आरोग्य शिबिर लावणी महोत्सव अधिक कार्यक्रम पार पाडले जातात.दि २ जानेवारी रोजी जिल्हा परिषद प्रशासनाच्या वतीने डॉ.शंकरराव चव्हाण कृषी प्रदर्शनात शेती व्यवसायात विवीध मार्गाचा अवलंब करून दर्जेदार शेती उत्पादन करणाऱ्या जिल्ह्यातील १९ शेतकऱ्यांचा सन्मान करण्यात आला.यात भोकर तालुक्यातुन रेणापुर येथील शेतकरी तथा भोकर रूरल फार्मस प्रोडुसर कंपनीचे संचालक व्यंकटराव हामंद यांचा सपत्नीक सत्कार करण्यात आला.
आमदार प्रताप पा.चिखलीकर व सिईओ यांच्या हस्ते शाल श्रीफळ पुष्पगुच्छ देऊन व फेटे बांधून सन्मान चिन्ह आणि साडीचोळी देऊन सन्मानित करण्यात आला. यावेळी शिवसेनेचे जिल्हा संघटक सुभाष नाईक किनीकर,भोकर रूरल कंपनीचे अध्यक्ष माधव पा.सलगरे, संचालक जळबा क्षीरसागर, पत्रकार संघाचे अध्यक्ष उत्तम कसबे, गंगाबाई हामंद, देवीदास राजेपोलु,राजु हामंद,चंद्र प्रकाश गोविंदवार,सेवा जंगवाड,विजय पा.सलगरे आदी सहीत जिल्हा परिषद प्रशासनातील विवीध अधिकारी व पदाधिकारी उपस्थित होते.