प्रतिनिधी / माली पाटील
∆ धर्माबाद रेल्वे स्टेशनला पाच जलद रेल्वे गाड्याचे थांबे देण्याची शिफारस दस्तूखुद्द माजी रेल्वेमंत्री पियुष गोएल यांनी केली होती. परंतु स्थानिक खासदारांच्या दुर्लक्षामुळे रेल्वेमंत्रालयाकडून त्याची अंमलबजावणी झाली नाही. त्यामुळे प्रलंबित रेल्वे स्टॉपेजेसची मागणी पूर्ण करण्या बाबत चे पुराव्यासह निवेदन दि. २ डिसेंबर २०२४ रोजी भाजपा खासदार डॉ.अजित दादा गोपछेडे व अशोक चव्हाण यांना दिले आहे.
धर्माबाद रेल्वे स्टेशनला मागील अकरा वर्षापासून एकही थांबा मंजूर नाही. दि.१८ डिसेंबर २०१३ ला सुपर फास्ट एक्सप्रेस तिरुपती -अमरावती- तिरुपतीला थांबा मंजूर झाला होता. दक्षिण मध्ये रेल्वे विभागात (scr) वसमत व गंगाखेड येथे कमर्शियल स्टॉपेजेस न तपासता जलद रेल्वे गाड्यांचे थांबे मंजूर केले गेलेले आहेत.तसेच भाजपा खासदार श्रीमती रक्षा खडसे यांच्या शिफारशीने भुसावळ, मलकापूर व नांदुर या तीन ठिकाणी सुपरफास्ट रेल्वेचे थांबे रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव यांच्या स्वाक्षरीने तीन महिन्यापूर्वी दि. २५ सप्टेंबर २०२४ रोजी मंजूर केले आहेत. याचाच अर्थ खासदार महोदयांनी जोरदार प्रयत्न केल्यास रेल्वे मंत्रालय सकारात्मक पाहते.मात्र नांदेड नांदेड लोकसभा मतदारसंघातील धर्माबाद उमरी व रेल्वे स्टेशन बाबत असे घडलेले नाही. धर्माबाद रेल्वे स्टेशनला पाच जलद रेल्वे गाड्याचे थांबे देण्याची शिफारस माजी रेल्वेमंत्री पियुष गोएल यांनी दि. ४ जुलै २०१९ च्या कार्यालयीन पत्राद्वारे केली होती. तब्बल सहा वर्षापासून याची अंमलबजावणी झालेली नसल्यामुळे धर्माबाद रेल्वे स्टेशनला उतरून प.पु.डॉ.केशव हेडगेवारच्या कंदकुर्ती या मूळ गावी जाण्यासाठी हजारो यात्रा करूची गैरसोय होत आहे. धर्माबाद स्टेशनला जलद रेल्वे गाड्याचे थांबे मिळण्याबाबत रमेश तिवारी, सतीश शिंदे व मनुरकर महाराज यांनी जंतर-मंतरच्या दिल्ली मैदानावर दि.२५ जानेवारी २०१६ रोजी उपोषण पुकारले होते.परंतु तत्कालीन खासदारांनी दुर्लक्ष केल्यामुळेच अकरा वर्षापासून धर्माबाद रेल्वे स्टेशनला एकही थांबा मंजूर झालेला नाही. विशेष म्हणजे धर्माबाद रेल्वे स्टेशन हे महाराष्ट्र व तेलंगणा दोन राज्याच्या सीमेवर असल्यामुळे सर्व जलद रेल्वेचे थांबे येथे विनाअट मंजूर होणे आवश्यक आहे. सर्व बाबीकडे लक्ष वेधण्यासाठी नांदेड जिल्हा प्रवासी संघटनेचे सदस्य व जेष्ठ पत्रकार डॉ जाधव यांनी मागण्याचे निवेदन देऊन नांदेडच्या दोन्ही भाजपा खासदाराचे लक्ष वेधले आहे.