मी देवेंद्र सरीता गंगाधरराव फडणीस शपथ घेतो की....

       मी पुन्हा येईन म्हणत ते आले अन....


                  प्रतिनिधी /माली पाटील 

∆ मी पुन्हा येईन ,मी पुन्हा येईन म्हणते आलेतच महाराष्ट्राच्या प्रगतीला दिशा देणारे अतिशय संयमी दूरदर्शी आणि कार्यक्षम नेतृत्व असलेले भारतीय जनता पार्टीचे तरुण व खंबीर नेतृत्व मी पुन्हा येईल मी पुन्हा येईल म्हणणारे परत येत महाराष्ट्रा त राज्याचे तिसऱ्यांदा मुख्यमंत्री म्हणून माननीय देवेंद्र गंगाधरराव फडणीस हे साधुसंत व महानीय व्यक्तीच्या उपस्थित ५ डिसेंबर रोजी आझाद मैदानावर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या उपस्थितीत झालेल्या सभेत शपथ घेतली.या वेळी टाळ्या व घोषणाचा जणु पाऊसच पडत होता.

 यंदा झालेल्या विधानसभा निवडणुकीत न भूतो न भविष्यती असा दणदणीत विजय मिळवत विरोधकाची अक्षरशः धुळधाण करीत राज्यात महायुती सत्तेत आली. या विजयात अनेक वाद-विवाद असले तरी पण महायुती लक्षणीय यश प्राप्त केली आहे दि. पाच डिसेंबर रोजी आझाद मैदान मुंबई येथे देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या उपस्थित झालेल्या ग्रँड शपथविधी सोहळात महामयीन राज्यपाल यांनी राज्याचे मुख्यमंत्री म्हणून देवेंद्र सरिता गंगाधरराव फडणवीस यांना शपथ दिली तर उपमुख्यमंत्री म्हणून शिवसेनेचे एकनाथ शिंदे व राष्ट्रवादीचे अजित पवार यांना शपथ दिली आहे.यावेळी मात्र शिवसेनेचे माजी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या चेहऱ्यावर उदासीन कळा दिसुन येत होती.ते नर्व्हस दिसत होते.पण भाजप पुढे त्यांचं मजबुरी का नाम महात्मा गांधी असेच दिसत आहे.ईकडे अजित दादा मात्र जाम खुश दिसत होते. या भव्य शपथविधी सोहळ्याला गृहमंत्री अमित शहा, राजनाथ सिंग, वेदप्रकाश नढा, नितीन गडकरी, रामदास आठवले, मुख्यमंत्री चंद्रबाबू, नायडू, मुख्यमंत्री योगी, मुख्यमंत्री नितीश कुमार,विजय रुपानी उद्योगपती अंबानी कुटुंब, सचिन तेंडुलकर सह पत्नी, शाहरुख खान, सलमान खान, माधुरी दीक्षित नेने व साधुसंतासह असंख्य जनसमुदाय उपस्थित होता.


Post a Comment

Previous Post Next Post