प्रतिनिधी /माली पाटील
∆ आजच्या रासायनिक शेतीमुळे शेतकऱ्यांचा वाढता खर्च कमी व्हावा म्हणून शेतकऱ्यांनी सेंद्रिय वा शाश्वत शेतीकडे वळावे यासाठी सेवा संस्था व फार्मर काॅटन कनेक्ट मार्फत मौजे रायखोड येथे महिला शेतकरी मेळावा संपन्न झाला.
सध्याच्या काळात शेती व्यवसाय करताना परवडेल अशी शेती करावी.यासाठी शेतकऱ्यांनी सेंद्रिय वा शाश्वत शेतीकडे वळावे जेणे करून कमी खर्चात शेतीत अधीक उत्पन्न मिळावे म्हणून सेवा संस्था भोकर व फार्मर कॉटन कनेक्ट मार्फत दि.३० जानेवारी रोजी भोकर तालुक्यातील मौजे रायखोड येथे महिला शेतकरी मेळावा आयोजित करण्यात आला.सेवा संस्था ही महिलाच्या उन्नतीसाठी कार्य करणारी सेवा संस्था असुन गत तिन वर्षांपासून या सेवा संस्थेने शाश्वत शेती विषयी महिला मेळावे घेत आहे.शेतकरी महिला शाश्वत शेती व्यवसायाकडे वळावे म्हणून तालुक्यातील पाच गावात संस्थेस कडुन इनपुट सेंटर उघडण्यात आले.असी माहीती महिला मेळाव्यात देण्यात आली.
या मेळाव्यासाठी सरपंच शंकरराव बुट्टनवाड,माजी उपसभापती सुरेश बिल्लेवाड,सह-पोलीस निरीक्षक कल्पना राठोड,कृषी सहायक आनंद बोईनवाड, डॉ.माया गर्जे, डॉ.तोटावाड, डॉ.माचेवाड,सेवा काडीनेटर सचीनभाई, जिल्हा काॅटन कनेक्ट मॅनेजर विलास चव्हाण, काॅटन कनेक्टचे कल्पेशभाई, प्रोजेक्ट काॅडीनेटर सतीश भैय्या,प्रोजेक्ट काडीनेटर प्रियांका हराळे, डिओ कल्पना भंडारे, महेश काळे,शुभम डुरे हे प्रमुख अतिथी म्हणून उपस्थित होते. या कार्यक्रमाचे नियोजन सौ.पुजा पांचाळ यांनी केले.यावेळी संस्थेचा सर्व आगेवानताई व परीसरातील महिला शेतकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते.