मराठी पत्रकार संघाला रामराम ठोकत व्हाईस ऑफ मीडिया संघटनेमध्ये पत्रकार अनिल डोईफोडे यांची इंट्री !

                       प्रतिनिधी /माली पाटील 

∆ भोकर तालुका अखिल भारतीय मराठी पत्रकार संघाचे तालुका उपाध्यक्ष वअतुलनीय लेखणीद्वारे दाहकता निर्माण करणारे पत्रकार अनिल डोईफोडे यांनी मराठी पत्रकार संघाच्या मनमानी कारभार ला कंटाळून या संघटनेला अखेरचा रामराम ठोकत व्हाईस ऑफ मीडिया या मोठ्या असलेल्या पत्रकार संघटनेत एन्ट्री करत प्रवेश केला आहे.

    व्हॉइस ऑफ मीडिया या पत्रकार संघटनेची दि. २ फेब्रुवारी रोजी नांदेड येथे होणाऱ्या  राज्य अधिवेशनानिमित्त  येथील शासकीय विश्रामगृहात जिल्हा अध्यक्ष प्रा. डॉ. गणेश जोशी यांच्या उपस्थित बैठक संपन्न झाली. यावेळी भोकर तालुका मराठी पत्रकार संघाचे तालुका उपाध्यक्ष पत्रकार अनिल डोईफोडे यांनी मागील भोकर येथील पाणीपुरवठा बैठकीच्या पत्रकार संघाच्या वागणुकीमुळे नाराज होऊन ते या मराठी पत्रकार संघाला रामराम ठोकत अध्यक्ष दत्ता बोईनवाड यांच्या करवी व्हाईस मीडिया जिल्हा अध्यक्ष प्रा. डॉ. गणेश जोशी जेष्ठ पत्रकार बाळासाहेब पांडे यांच्या उपस्थित व्हाईस ऑफ  मीडिया या संघटनेत प्रवेश केला आहे. जिल्हा अध्यक्ष गणेश जोशी यांनी त्याचं स्वागत व सत्कार करून व्हाईस ऑफ मीडिया या संघटनेत आपला मान व सन्मान राखला जाईल असे आश्वासन दिले. या प्रवेशाच्या वेळी जिल्ह्यातील अनेक पत्रकार उपस्थित होते, तर भोकर येथील व्हाईस ऑफ मीडिया संघटनेचे तालुका अध्यक्ष दत्ता बोईनवाड, उपाध्यक्ष सुरेशसिंह चौधरी, जिल्हा कार्यकारिणी सदस्य सरपाते, कार्याध्यक्ष सुभाष नाईक माली पाटील, बी प्रकाश, संतोष रतनवार आदी पत्रकार उपस्थित होते.



Post a Comment

Previous Post Next Post