भोकर/ माली पाटील
भोकर (माली पाटील)- महसूल विभागाचे किनी-पाळज वर्तुळ मंडळाचे नुतन मंडळाधीकारी म्हणून नियुक्ती झालेले जनार्दन पाटील मुंगल यांचे शिवसेनेच्या वतीने शिवसैनीकानी शाल श्रीफळ पुष्पगुच्छ देऊन सत्कार केला आहे.
भोकर तालुक्यातील किनी हे तेलंगणा शेजारील असलेले सर्कलचे मोठे गाव.येथील कार्यान्वित असलेले तत्कालीन मंडळ अधिकारी शेख मुसा यांची सेवा निवृत्ती झाल्याने या रिक्त जागेवर हदगाव तालुक्यातील येवली येथुन बदलुन आलेले श्री जनार्दन पाटील मुंगल हे नुतन मंडळाधीकारी म्हणून पदभार स्वीकारला असल्याने त्यांचा यथोचित सन्मान शिवसेनेचे माजी तालुका प्रमुख प्रदिप पाटील दौलतदार, जिल्हा समन्वयक अँड.परमेश्वर पांचाळ व जिल्हा संघटक सुभाष नाईक किनीकर यांनी तहसील येथील मंडळाधिकारी कार्यालयात मुंगल जनार्दन यांचा शाल, श्रीफळ व पुष्पगुच्छ देऊन सत्कार करण्यात आला.यावेळी मंडळ अधिकारी मगरे, तलाठी भोकर मुनेश्वर,तलाठी पिंपळढव हे हजर होते.