किनी-शिवलींग शिखर भुरभुशी ते माहुरगड पायी दिंडी यात्रा प्रारंभ



   
प्रतिनिधी माली पाटील 

भोकर तालुक्यातील किनी येथुन किनी-शिवलिंग शिखर भुरभुशी ते माहुर पायी दिंडी यात्रा शिवसेना उबाठा पक्षाचे नांदेड जिल्हा संघटक सुभाष नाईक किनीकर व माजी जि.प.स.तथा सरपंच सुनील चव्हाण यांच्या मार्गदर्शनाखाली दि. ७ फेब्रुवारी पासून प्रारंभ झाला आहे.

     माघ महिन्याच्या शुक्ल पक्षाची पौर्णिमा म्हणजे माघ पौर्णिमा या माघ पौर्णिमेच्या निमित्ताने तिर्थ यात्रा करावी व गंगा स्नान करून पाप मुक्त व्हावे म्हणून दिंडी यात्रा काढल्या जातात. छंद मना घेई | दत्ताचा|| माहुर क्षेत्री घेतो | त्यासी तुं घ्यावी || सह्याद्रीसी वास तयाचा | तेथे तुं जाई || स्नानास्तव तो सेवी गंगा | नत चरणी होई || दि.७ फेब्रुवारी रोजी किनी येथुन पायी दिंडी निघुन शिवलिंग शिखर येथे दुपारी आरती करुन दर्शन घेत पायी दिंडी यात्रा दत्त नामाच्या गजरात निघते.सकाळी भुरभुशी येथे अन्नगृहन करुन सायंकाळी हिमायतनगर येथील परमेश्वर मंदिर येथे मुक्काम. परत ढाणकी,फुलसावंगी व ईळेश्वर येथे मुक्काम करुन दि.११ रोजी काळापाणी येथे स्नान करून माहुर गढ मुक्कामी दत पायी दिंडी यात्रा महापुजा करून समाप्त होते.या दिंडीचे आयोजन दरवर्षी दत्तात्रय तोकलवाड व देवारेड्डी लोलपवाड हे करतात.तर या दिंडीत मार्गदर्शक म्हणून शिवसेनेचे जिल्हा संघटक तथा व्हाईस ऑफ मीडिया पत्रकार संघटनेचे कार्याध्यक्ष सुभाष नाईक (माली पाटील) किनीकर, शिवसेनेचे माजी जि.प.सदस्य सुनील चव्हाण हे गत तिन वर्षांपासून काम करतात.या पायी दिंडीत दोनशे ते अडीचशे भावनीक सहभागी असतात.


Post a Comment

Previous Post Next Post