लोकभावना न्युज वृत्तसेवा संस्था
∆ सरकारी कामात होणारे भ्रष्टाचार, कर्मचाऱ्यांकडून होणारी पिळवणूक व सर्व सामान्य लोकांना लोकांवर होणारा अन्याय या विरुध्द लढा देत सर्व सामान्य लोकांना न्याय मिळवून देण्यासाठी देशात कार्यरत असलेल्या ऑन्टीक्रप्शन बुरो ऑफ इंडिया ग्रुपची नांदेड जिल्ह्यातील पदाधिकारी नियुक्ती पत्र मराठवाडा अध्यक्ष निळकंठ वर्षेवार यांच्या हस्ते वाटप करण्याचा कार्यक्रम संपन्न झाला आहे.
ऑन्टीक्रप्शन बुरो ऑफ इंडिया ग्रुपची नांदेड जिल्हा बैठक दि. ११ एप्रिल रोजी दुपारी २ वाजता शासकीय विश्रामगृह भोकर येथे घेण्यात आली.या बैठकीत ऑन्टीक्रप्शन बुरो ऑफ इंडिया ग्रुपची जिल्हा कार्यकारिणी जाहीर झालेल्या पदाधिकारी यांना निवडीचे प्रमाणपत्र व ओळख पत्राचे id चे वाटप राष्ट्रीय अध्यक्ष अस्लम हुसेन शेख यांच्या आदेशानुसार मराठवाडा अध्यक्ष निळकंठ वर्षेवार यांच्या हस्ते करण्यात आले.यावेळी जिल्हा अध्यक्ष सुनील बच्चेवार हे उपस्थित होते.
यावेळी चांदु पंतलवाड जिल्हा उपाध्यक्ष,अनील डोईफोडे जिल्हा प्रसिध्दीप्रमुख तर महिला आघाडीत जिल्हाअध्यक्ष म्हणून कमलताई प्रकाश गाजुलवार,सौ.सुरेखा शिवाजी चव्हाण जिल्हा उपाध्यक्ष, प्रणिता शरद जोशी जिल्हा उपाध्यक्ष,राणी दिगाबंर पोटेवाड उमरी तालुकाध्यक्ष, पद्ममिना गंगाधर सुर्यवंशी उमरी तालुका उपाध्यक्ष, भाग्यश्री आकाश कटकदणे उमरी शहराध्यक्ष, रेखाताई आकाश सिंह ठाकुर उमरी शहरउपाध्यक्ष या सर्व पदाधिकारी यांना नियुक्ती पत्र व ओळख आयडीचे वाटप करण्यात आले.यानंतर सर्व नव निर्वाचित पदाधिकारी यांचा शाल, श्रीफळ पुष्पगुच्छ देऊन सत्कार करण्यात आला आहे.यानंतर मराठवाडा अध्यक्ष निळकंठ वर्षेवार यांनी नवनियुक्त कार्यकारिणीला ग्रुपच्या कार्या विषयी मार्गदर्शन केले आहे.