लोकभावना न्युज वृत्तसेवा ____
∆ सध्या सोन्याचे दर ५६, ००० होणार असल्याचं बातम्यानी ग्राहकात धावपळ सुरू झाली असुन सोन विक्री साठी अनेक ठिकाणी झुंबड उठत असल्याच्या राज्यात बातम्या आहेत. नासीक येथे तर लोकांची सोन विक्री साठी रांग लागल्या च्या बातम्या आहेत.पण लोकांनी अफवांवर विश्वास ठेवु नये असे सराफा दुकानदार सांगत आहेत.
अमेरीकेच्या आक्रमक व्यापारी धोरणामुळे आणि टॅरीक वारमुळे जगभरात भितीचे वातावरण असतानाच सोने आणि चांदी स्वस्त होण्याचा दावा होत आहे. अशातच देशभरात सोन्याचे भाव दर गगनाला भिडले आहेत. सोनं प्रति तोळा ९२ हजारावर गेला आहे. सोन्याच्या वाढत्या किमतीमुळे ज्यांनी आधीच गुंतवणूक केली होती. त्यांच्या चेहऱ्यावर आनंद आहे. मात्र जे गुंतवणुकीसाठी किमती कमी होण्याची वाट पाहत आहे. त्यांच्यासाठी गुड न्यूज आहे अमेरिकेतील विश्लेषकाने सोन्याबाबत मोठा अंदाज वर्तविला आहे. पुढील काही वर्षात सोन्याच्या दारात ३८ ते ४० टक्के घसरण होणार असल्याचा दावा त्यांनी केला आहे. म्हणजेच सोन जवळपास ५७ हजार रुपये होण्याची शक्यता आहे. अमेरिकेतील मॉर्निंग स्टारचे विश्लेषण जान मील्स यांनी हा अंदाज वर्तविला आहे. हा अंदाज खरा ठरला तर गुंतवणूकदाराची चांदी आहे.
आज, ११ एप्रिल २०२५ रोजी आज भारतातील १० ग्रॅम २४ कॅरेट सोन्याचा दर सुमारे ₹ ९०००० ते ₹९३००० च्या दरम्यान आहे. २२ कॅरेट सोन्याचा दर सुमारे ₹८२,००० ते ₹ ८७,००० च्या दरम्यान आहे.
५६ हजार रुपयांपर्यंत दराची शक्यता..? -------------------------------------------------
काही तज्ज्ञांनी असा अंदाज वर्तवला आहे की, येत्या काही वर्षांत सोन्याच्या दरात मोठी घसरण होऊ शकते आणि ते ₹५५००० ते ₹५६,००० पर्यंत खाली येऊ शकते. अमेरिकेतील एका तज्ज्ञाने असा दावा केला आहे की, सोन्याच्या किमतीत ३८% पर्यंत घट होऊ शकते, ज्यामुळे भारतातील दर ₹५६००० पर्यंत खाली येऊ शकतात.या अंदाजांना असलेला विरोध:
अनेक तज्ज्ञ या अंदाजांना सहमत नाहीत. त्यांचे मत आहे की भू-राजकीय तणाव आणि आर्थिक अनिश्चितता यांसारख्या कारणांमुळे सोन्याचे दर वाढू शकतात.असा निष्कर्ष: आहे.
सोन्याचे दर ५६,000 पर्यंत खाली येण्याची शक्यता आहे, पण ही केवळ एक शक्यता आहे. आणि याला अनेक तज्ज्ञांचा विरोध आहे. सध्याचे दर पाहता, लगेचच सोने ५६,००० पर्यंत येईल असे म्हणणे निश्चितपणे खरे नाही. बाजारातील बदल आणि जागतिक परिस्थिती यावर सोन्याचे भविष्य अवलंबून असेल.
..... एक लाखापर्यंत दर पोहचु शकतो ?
-------------------------------------------------------
सोन्याचा दर प्रति ग्राम एक लाख रुपये पर्यंत पोहोचण्याची शक्यता आहे. तज्ञा मध्येही शक्यता खूपच समजुत आहे. सध्या सोन्याचा दर एक लाख पेक्षा फक्त काही हजार रुपयानी कमी आहे. त्यामुळे लवकरच तो एक लाखावर पोहोचू शकतो असेही काही तज्ञाचे मत आहे.
त्यामुळे सोने खरेदी विक्री करणाऱ्यानी गोंधळून न जाता तज्ञांचा सल्ला घेऊनच व्यवहार करावा असे सांगितले जात आहे.