भोकर तालुक्यातील ३३ ग्राम पंचायतीच्या सरपंच पदी कारभारीन बसणार !

 

                  प्रतिनिधी / माली पाटील 

• प्रतीक्षेत असलेल्या ग्राम पंचायतीच्या सरपंच पदाच्या आरक्षण सोडत जाहीर झाली असुन भोकर तालुक्यातील अर्ध्या ग्राम पंचायतीवर कारभारीनच राज्य राहणार असुन उर्वरित अर्ध्या ग्राम पंचायतीवर कारभारी कारभार करणार असल्याचे चित्र स्पष्ट झाले आहे. यामुळे कुठे खुशी तर कुठे गम असाच सारासार राजकारण्यांचा दिसुन आला.

     निवडणूक म्हणजे हौसे,नवसे व गवसे यांच्या साठी एक पर्वणी.ग्रा.पं.निवडणुक म्हणजे यांची हौसच न्यारी पण आरक्षणाच्या सोडतीत मनाप्रमाणे जागा सुटली नाही तर हे गम मध्ये असतात. दि.१ जुलै रोजी भोकर येथील उपविभागीय कार्यालय येथे उपविभागीय अधिकारी प्रवीण मेंगशेट्टी यांच्या मार्गदर्शनाखाली तहसीलदार विनोद गुंडमवार यांनी तालुक्या तील ६६ ग्राम पंचायत सरपंच आरक्षण  २०२५-३० सोडत जाहीर केली आहे.यात विष़ेश म्हणजे चिठ्ठ्या टाकून आरक्षण काढण्यात आले. यात विषश म्हणजे ओबीसीला २७ टक्के आरक्षण न्यायालयाने जाहीर केल्याने केवळ ओबीसीचा वाढीव कोठा हा सर्वसाधारण कोठ्यातुन भरण्यात आला. यामुळे ६६ ग्राम पंचायतीच्या आरक्षण याप्रमाणे अनुसूचित जाती -१०, अनुसूचित जमाती - १४ , नागरीकांचा मागास प्रवर्ग (ओबीसी)-१८ तर सर्व साधारण (ओपन) -२४ अशा जागा सोडण्यात आल्या.यातील ३३ ग्राम पंचायतीवर महिला गावची कारभारीन म्हणून काम पहाणार आहे.यात एस्सी साठी पाळज बल्लाळ, दिवशी खू., मातुळ, हळदा, सोमठाणा, राहटी बु, धानोरा, सावरगाव माळ ,जाकापूर तर एसटी साठी वाकत, बोरवाडी, गारगोटवाडी दि ,भरभुशी, धावरी, डोरली पा., गारगोटवाडी पा, आमदरी, नागापूर, जामदरी, रिठा, नारवट समंदरवाडी, ताटकळवाडी आणि ओबीसी साठी रावणगाव, बेंद्री,देवठाणा, दिवशी बु. ,जांभळी, महागाव,बटाळा- किनाळा सायाळ, लामकानी, ईळेगाव, धारजणी, डौर, सोनारी, धावरी खु., सावरगाव मेट, नांदा म्है.प., हसापूर तर ओपन साठी किनी, पाकी, खडकी, खरबी, मोघाळी, नांदा खु, हाडोळी, पिंपळढव, बेंबर ,चिंचाळा प.भो,आमठाणा, पांडुरना, थेरबन, चिदगिरी, नांदा बु ,कांडली, रायखोड, कोळगाव बु, रेणापूर, बोरगाव, कोळगाव खुर्द, लगळूद आदी गावांत आरक्षण सुटले आहे. या सोडतीच्या वेळी महसूल कर्मचारी व सरपंच, उपसरपंच, चेअरमन व गावातील पॅनल प्रमुख यांची उपस्थिती होती.


     


Post a Comment

Previous Post Next Post