पंधरा दिवसापासून पावसाची दांडी अन् शेतकऱ्यांचे डोळे आभाळाकडे

•दुबार पेरणीचे संकट  •पिके कोमेजून जाऊ लाग

                     प्रतिनिधी / माली पाटील 

• निसर्गावर अवलंबून असलेली शेती शेतकऱ्यांच्या जिवावरच बेतते असी अवस्था असुन जुन महिन्यात पडलेल्या पावसा मुळे शेतकऱ्यांनी आपल्या शेतात खरीप हंगामाची पेरणी केली.पिक डोलु लागली परंतु गत पंधरा ते विस दिवसांपासून पाऊस रुसून बसला असल्याने पिक मात्र माना टाकत असल्याने शेतकरी आभाळाकडे डोळे लावून बसला आहे.पडलेल्या पावसातुन जमीनीतुन अद्याप पाणी बाहेर न निघाल्याने शेतीत ओलावा पिक सुकु लागली असल्याने शेतकऱ्यांना दुबार पेरणीचे संकट ओढवले आहे.

      शेतकरी म्हणजे उत्पादन करणारा कष्टकरी मालक तर सरकारी नौकरी करणारा जनतेचा सेवक पण उन्हातान्हात घाम गाळून धान्याची उत्पन्न करणारा मालक जरी असला तरी सावलीत पंख्याखाली बसुन कारभार करणारा नौकरी आजच्या घडीला आरामदायक जिवन जगत आहे. शेती ही शेतकऱ्यांची जननी.निसर्गाच्या मेहरबानी वर शेती व पिकांचे जिवन आणि निसर्ग जर रुसून बसला तर शेतकऱ्यांच मरण !

  मे महिन्याच्या शेवटच्या आठवड्यात अवकाळी पाऊस मोठ्या प्रमाणावर बरसला त्यानंतर जुन महिन्यात पडलेल्या अवकाळी पावसाच्या जोरावर पिकांनी एक महिना तग धरला मात्र जून जुलै महिन्यात अपेक्षित पाऊस झाला नाही. त्यामुळे कपाशी, सोयाबीन, तूर, उडीद ही पिके कोमेजू लागली आहेत. मागील पंधरा दिवसापासून पाऊस खंड असल्याने पीके पाण्या वाचून होरपळून जाण्याच्या मार्गावर आहेत. त्यामुळे आता तरी पाऊस पडावा यासाठी शेतकरी आभाळाकडे डोळे लावून बसले आहेत. दोन दिवस  ऊन तर दोन दिवस आभाळ असा निसर्गाचा खेळ खंडोबा चालु आहे.उसनवारी करून शेतकऱ्यांनी बी-बियाणे खरेदी करून पेरणी लागवड केली. पिके चांगली उमगल्याने शेतकरी दादा खते टाकली, महागड्या औषधाची फवारणी केली. अंतरमशागतीची कामे देखील केली मात्र मागील पंधरा दिवसापासून पावसाने दांडी मारल्याने जोमात आलेली पिके ही माना टाकू लागली आहेत. त्यामुळे शेतकरी चिंतातुर झाले आहेत. पेरलेली पिके जगविण्यासाठी आत्ता पावसाची नितांत गरज आहे.आभाळ भरगच्च भरुन येत आहे पण पाऊस काही पडत नाही.सध्या सोयाबीन,उडीद व मुग हे पिक गेल्याच जमा आहेत.नदी नाल्यात अजुन ही पाणी नाही.धरणे कोरडे ठाक आहेत.त्यामुळे या दोन-चार दिवसात पाऊस पडला नाही तर दुबार पेरणीचे संकट शेतकऱ्यांवर ओढवले जाणार आहे.राज्यात आलेलं सरकार दळभद्री असुन या सरकारमधील भ्रष्ट मंत्री,पक्ष फोडी, विधानसभा आवारात मारामारी यातच मग्न असुन शेतकऱ्यांच्या प्रश्नाकडे साफ दुर्लक्ष असल्याने शेतकरी निराशेत जगत आहे.


Post a Comment

Previous Post Next Post