प्रतिनिधी / माली पाटील
∆ भोकर विधानसभा मतदारसंघातील बहुजनांचे नेते नागनाथ घिसेवाड हे आपल्या शेकडो कार्यकर्त्यांसह मुंबईला रात्रीच रवाना झाले असून आज आ.प्रताप पाटील चिखलीकर यांच्या मार्गदर्शनाखाली उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या उपस्थितीत राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात प्रवेश करणार असल्याचे समजते.
सध्या राजकीय वातावरण हे सोयीचं होतं चाललं आहे.या सोईच्या राजकारणात मात्र शिवसेना उध्दव बाळासाहेब ठाकरे पक्ष, काँग्रेस पक्ष व राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाची मोठी वाताहत होत असल्याचे चित्र आहे.सध्या जो तो सत्ताधारी पक्षाच्या वळचणीला आश्रयासाठी धावत आहे.पळा पळा म्हणत जो तो सत्ताधारी बुलेट ट्रेन पकडत आहे.भोकर तालुक्यातील अनेक मातब्बर मंडळी पक्षांतर करीत आहेत. असो बहुजनांचे नेतृत्व केलेले नागनाथ घिसेवाड हे आ.प्रताप पाटील चिखलीकर यांच्या समवेत तालुक्यातील राजकारणात सक्रिय होणार असल्याचे दिसते.माजी मुख्यमंत्री खा.अशोक चव्हाण यांच्या साम्राज्याला आव्हान देण्यासाठी चिखलीकर सरसावले असुन त्यामुळेच सर्व चव्हाण विरोधी लोकांना राष्ट्रवादी पक्षात प्रवेश करुन घेत असल्याचे बोलले जात आहे.
नागनाथ घिसेवाड यांच्या सोबत आचार व विचार असलेले नेते नागोराव बापु शेंडगे हे सुध्दा आज उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या उपस्थितीत प्रवेश करणार असल्याचे समजते.