प्रतिनिधी / माली पाटील
• नांदेड येथे जिल्ह्यातील धनगर समाजाच्या गुणवंत विद्यार्थ्यांचा भव्य सत्कार सोहळा रविवारी २० जुलै रोजी सकाळी अकरा वाजता कुसुम सभागृह नांदेड येथे आयोजित करण्यात आला आहे.
दरवर्षीप्रमाणे यावर्षी धनगर समाज गुणवंत विद्यार्थी सत्कार समितीच्या वतीने नांदेड जिल्ह्यातील गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार कार्यक्रम करण्यात येत असून गुणवंत विद्यार्थी हे इतरांसाठी प्रेरणास्थान असतात. त्यांच्याकडून शिकण्यासारखे बरेच काही असते. ते आपल्या बुद्धिमत्तेने आणि मेहनतीने नेहमीच यश संपादन करतात त्यामुळे त्यांना प्रोत्साहन मिळावे म्हणून गुणवंताचा सन्मान करण्याचा मुख्य उद्देश आहे. नांदेड येथे होणाऱ्या या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी जेष्ठ विधीज्ञ अँड. शिवाजीराव हाके हे राहणार असून प्रमुख अतिथी म्हणून मंगेश झाले कामगार आयुक्त लातूर, माधवराव सलगर माध्यमिक शिक्षणाधिकारी नांदेड, सुभाष बोंद्रे उपसंपादक दिव्य मराठी छ. संभाजीनगर, अभय शिखरे सहाय्यक सरकारी अभियंता नांदेड, प्रा. महादेव बनसोडे विभाग प्रमुख शासकीय वैद्यकीय महाविद्यालय लातूर आदी मान्यवर उपस्थित राहणार आहेत. या गुणवंत विद्यार्थी सत्कार सोहळा दहावी व बारावी वर्गात ८० टक्के पेक्षा जास्त गुण घेणारे, विद्यार्थी नीट परीक्षेत ४०० हून अधिक गुण घेणारे, जे परीक्षेत ८५ टक्के पेक्षा जास्त गुण मिळवणारे विद्यार्थी नवोदय प्रवेश परीक्षेत यशस्वी विद्यार्थी तसेच पाचवी व आठवीच्या शिष्यवृत्ती परीक्षेत आणि विविध स्पर्धा परीक्षांमध्ये प्राविण्य मिळवणाऱ्या विद्यार्थ्यांचा गौरव करण्यात येणार आहे. जिल्ह्यातील धनगर समाजाच्या बांधवांनी या कार्यक्रमास उपस्थित राहून आपल्या गुणवंत विद्यार्थ्यांना प्रोत्साहन द्यावे, असे आवाहन धनगर समाज गुणवंत विद्यार्थी सत्कार समिती नांदेड च्या वतीने करण्यात आले आहे.