प्रतिनिधी / अनील नाईक
भोकर तालुक्यातील मौजे दिवशी खुर्द येथील चालू कर्जदार शेतकऱ्यांना सेवा सहकारी सोसायटी अंतर्गत व जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक किनी शाखा कडून वीस टक्के वाढीव कर्ज वाटप करण्यात आले.
ग्रामीण भागामध्ये विविध कार्यकारी सेवा सहकारी सोसायटी मार्फत शेतकऱ्यांना कर्ज पुरवठा केला जात असे शेतकऱ्यांचा मुख्य आधार ह्या सोसायटी होत्या, पण जिल्हा बँक ह्या डबघाईस आल्याने या माध्यमातून होणारा कर्जपुरवठा बंद झाला असल्या कारणाने सोसायट्या ही घायकुतीला आल्या आणि यात शेतकऱ्यांनी सोसायटी संस्थेकडे शेतकरी पाठ फिरवली व सोसायटी ऐवजी परंतु राष्ट्रीय बँका कडुन कर्ज घेतले आहे. परंतु आता जिल्हा बँकेची परिस्थिती सध्या रूळावर आल्याने सेवा सोसायटी संस्थाचा मार्ग सुरळीत होऊन आता कर्जपुरवठा केला जात आहे. अशातच दिवशी खुर्द येथील शिवसेनेचे नेते तथा सोसायटचे चेअरमन श्री गंगाधर महादवाड यांनी शेतकऱ्यांना कर्ज उपलब्ध व्हावे म्हणून बँकेशी वेळोवेळी संपर्क साधून शेतकऱ्यांना कर्ज अंतर्गत कर्ज मिळवून देण्याचा प्रयत्न केला दिनांक ७ मे रोजी किनी येथील जिल्हा मध्यवर्ती बँक शाखेत एक छोटेखानी कार्यक्रम घेऊन यात मौजे दिवशी खुर्द येथील शेतकऱ्यांना सेवा सहकारी सोसायटीच्या माध्यमातून चालू बाकी असणाऱ्या शेतकऱ्यांना २० टक्के वाढीव प्रमाणे कर्ज वाटपाचा कार्यक्रम संपन्न झाला आहे. शिवसेनेचे नेते तथा चेअरमन गंगाधर महादावाड यांच्या मार्गदर्शनाखाली व दिवशीच्या शेतकऱ्यांना रक्कम सहा लाख रुपयांचे कर्ज वाटप करण्यात आले. या शेतकऱ्यांना पेरणीच्या काळात दिलासा मिळवून देण्यात चेअरमन गंगाधर महादावाड बॅंकेचे व्यवस्थापक एस.आर. भोसले संस्थेचे सचिव आर.डी. सुंकरवाड यांनी प्रयत्न केले.यावेळी शिवसेनेचे सुभाष नाईक किनीकर,मा.सरपंच तिरुपतरेड्डी मुत्यालवाड, बँकेचे कोषागार जि.एम. कंगटे एम.जी. जाधव शाखा अधिकारी, संतोष गाढे, यादवराव मोरे, शोभाबाई बोरशेट्टे,गाढे शिवाजी, भारतबाई रत्नाकर मोरे,सदानंद ढगे,हनमनलु नडकुडवाड आदी हजर होते.