बोरगाव येथे धाडसी दरोडा;दोन लाखांचा ऐवज लंपास

 


             प्रतिनिधी / माली पाटील

भोकर दि.२५ - भोकर शहरापासून तिन कि.मी अंतरावर असलेल्या बोरगाव येथे मंगळवारी मध्य रात्रीनंतरच्या सुमारास गावातील दत्ताराम हुनाजी मेटेवाड यांच्या घरी पाच ते सात अज्ञात चोरट्यानी घरात प्रवेश करुन हातात शस्त्र घेऊन धाक दाखवत कपाट फोडुण त्यातील एक लाख रुपये आणी दतराम यांची पत्नी जिजाबाई यांच्या कानातील, गळ्यातील सोन्याची व हातात घातलेल्या चांदीचे दागिने असे साठ तोळे हिसकावुन घेतले आणि जबर मारहाण केली.तसेच प्रतिकार करत असलेल्या दत्ताराम यांना चोरट्यांनी चाकुने कान कापला व नकावर बुक्या मारल्या.व गंभीर जख्मी केले.लगेच चोरटे दुसऱ्या घराकडे मोर्चा वळवत मारोती हुबेवाड यांच्या घरात शिरुन पत्नीच्या गळ्यातील सोन्याची पोत व कानातील फुल तोडुन मारहाण केली.             सोपान मेंडके यांच्या घरातुन पाच हजार रुपये चोरुन लगेच बाजुस असलेल्या पार्वतीबाई माधव याटेवाड यांच्या गळ्यातील सोन्याची चैन काढुनी घेतली.तसेच शोभाबाई मारोती हुबेवाड यांना धाक दाखवून गळ्यातील सोन्याची पोत ओढुन घेतले आणि मारहाण केली.तेव्हा त्यांच्या डोक्याला मार लागला.यांच्या घरी आलेले सोयरे केशव अनपवाड यांना मारहाण करुण जख्मी केले.यानंतर चोरटे शेतातील आखाड्यावर मोर्चा वळविला व  आखाड्यावरील केशव गंगाराम जाधव येथे जाऊन जोरदार दगडफेक केली.अशा प्रकारे गावात दहशत निर्माण केली आहे.यामुळे गावकऱ्यांत दहशत पसरली.        गावात चोरटे प्रवेश करताना प्रचंड दगडफेक करत दहशत निर्माण केली.यामुळे लोक जागे झाले अन् आरडाओरड सुरू केली.जे लोक बाहेर आले त्यांना दगड भिरकावून मारत होते.त्यामुळे लोक भिती पोटी कोणीही बाहेर येऊन मदत करण्यास धजावत नव्हते प्रचंड दहशतीमुळे लोक चोरट्यांचा सामना करु शकले नाही.

सदरील चोरटे बनीयन घातलेले व तोंडावर कापडाची पट्टी बांधून पॅन्ट घातलेले असल्याचे गावकरी सांगत होते.या प्रकरणी भोकरचे उपविभागीय पोलिस अधिकारी श्री विक्रम गायकवाड व  पोलीस निरीक्षक विकास पाटील यांनी घटनास्थळी भेट देली.फिर्यादी दत्ताराम येटेवाड  यांनी दिलेल्या फिर्यादीवरून भोकर पोलीसांनी गुरव १८१ कलम ३९४ प्रमाणे गुन्हा दाखल केला आहे.पो.नि.विकास पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली उप-निरीक्षक अनील कांबळे हे तपास करीत आहेत.


Post a Comment

Previous Post Next Post