प्रतिनिधी / माली पाटील
भोकर दि.२६ सोमठाणा फाटा ते भोकर रस्त्यावरील मौजे शिंगारवाडी जवळ रस्त्यावर क्रुजर झिप व मोटार सायकल ची धडक झाली असून यात दुचाकी स्वा गंभीर जख्मी झाल्याची घटना दिनांक 25 मे रोजी रात्री उशीरा घडली आहे भोकर तालुक्यातील सावरगाव माळ येथून 25 रोजी रात्री उशिरा लग्नकार्यासाठी भोकर मार्गे गोरठा तालुका उमरी येथे निघालेल्या क्रुझर जीप क्रमांक एपी २१ टि टी ८६१९ ने बीपी पिक्चर समोरून येणाऱ्या दुचाकी क्रमांक एम एच २६ बि डब्लु ६३६८ ला सोमठाणा शिवारात जवळील सिंगर वाडी जवळ जबर धडक दिली धडक दिली.इतकी जबरदस्त होती की दुचाकी क्षतिग्रस्त होऊन क्रुझर जीप रस्त्याच्या कडेला खाली खड्ड्यात गेली अपघातात दुचाकीस्वार पांडुरंग महादेव जंगवाड रा. सिंगर वाडी हे गंभीर जखमी झाले असून क्रूजर मधील आठ जण किरकोळ जखमी झाले आहेत. गंभीर जखमींवर येथील ग्रामीण रुग्णालयात प्राथमिक उपचार करून अधिक उपचारासाठी नांदेडला रवाना करण्यात आले आहे तर किरकोळ जखमींवर उपचार करून घरी पाठविण्यात आले याबाबत पोलिसात m.l.c. नोंद करण्यात आली असून गुन्हा दाखल झाला नव्हता.