प्रतिनिधी / लक्ष्मीकांत राऊत
परतुर दि.२७ - परतुर हॉस्पिटलच्या शहरातील सिटी हॉस्पिटलच्या संचालिका तथा स्त्री रोगतज्ञ डॉ.संध्या डॉ संध्या सत्यानंद कराड मानते यांचे वडील सेवा निवृत्त पोलिस निरीक्षक भानुदास उमाजी मानते यांचे हृदयविकाराने 26 मे रोजी निधन झाले ते मूळचे देऊळगाव राजा येथील रहिवासी असून त्यांना उत्कृष्ट पोलीस सेवेबद्दल तत्कालीन पोलीस महासंचालक पसरिचा यांच्या हस्ते तसेच तत्कालीन गृहमंत्री आर. आर. पाटील यांच्या हस्ते विशेष पुरस्काराने गौरव करण्यात आला होता मंत्रालयातील अवर सचिव सुभाष जाधवर यांचे ते सासरे होते. त्यांच्या पश्चात मुलगा डॉक्टर अनिरुद्ध मानते ,मुलगी गीता वनवे, विद्या कुकडे, अनुराधा जाधवर, जावई विजय वनवे ,राजेश कुकडे ,जावई डॉक्टर सत्यानंद कराड व सुहास जाधवर असा मोठा परिवार आहे.