तामसा प्रतिनिधी / नंदेश्वर भुतनर
( दि. ५ मे २०२२)
तामसा येथे एका पिसाळलेल्या कुत्र्याने येथील जवळपास पंधरा जनांना चावा घेतल्याने तामसा वाशीयामधे भितीचे वातावरण पसरले असून यामुळे तामसा शहरात मोकाट कुत्र्यांचे प्रमाण मोठ्या प्रमाणावर वाढत असुन येथील ग्राम पंचायतीचे दुर्लक्ष होत असुन यासाठी कुठल्याही प्रतीबंधात्म उपाययोजना करण्यात कमालीची उदासीनता दिसून येते.दि.५ रोजी गुरुवारी रोजी एका पिसाळलेल्या कुत्र्याने शहर व परिसरातील आलेल्या जवळपास पंधरा लोकांना चावा घेतला आहे.यात चावा घेतलेल्या लोकांना तामसा येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात उपचार करण्यात आले.यामध्ये नितीन चव्हाण लोहा, अर्चना भुतनर पांगरी,अनील पवार पाथरड, श्यामराव कदम वडगाव, प्रकाश गायकवाड वाडी,पियुष देशमाने, जगदीश डांगे,मोहना देवी डांगे,शिवम सोमेवाड, शेख रेश्मा,रमेश गायकवाड, सुरेश कोडगीरवार सर्व रा.तामसा हे सर्वजन प्राथमिक आरोग्य केंद्रात उपचार तर काही जन खासगी दवाखान्यात उपचार करुन घेतले.यामुळे ग्राम पंचायत कार्यलयाने शहरात वावरणाऱ्या मोकाट व पिसाळलेल्या कुत्र्यांचा बंदोबस्त करावा असी मागणी येथील जनतेने केली आहे.