प्रतिनिधी / माली पाटील किनीकर
• भोकर (जि.नांदेड)- एकी कडे भोकर तालुक्यात विकासाची गंगा वाहत आहे असे जरी चर्चिले जात असले तरी अजुन ही काही गावे विकासापासून कोसो दूर आहेत.असेच बेंद्री व तांडा या गावची अवस्था विकासा विना तथा निधी अभावी अत्यंत वाईट आहे.त्यामुळे माजी मुख्यमंत्री अशोकराव चव्हाण यांनी या गावास भरघोस निधी उपलब्ध करून देऊन विकास साधुन न्याय द्यावा असी मागणी येथील नागरिकांनी केली आहे. भोकर तालुक्यात बेंद्री व तांडा गट ग्राम पंचायतचे गाव आहे.हे गाव गेल्या अनेक दिवसांपासून विकास कामा पासुन वंचित आहे.सध्या तालुक्यात अनेक गावच्या रस्ते व पुल बांधकाम मोठ्या प्रमाणावर चालु आहेत.या विधानसभेचे लोकप्रतिनिधी तथा माजी मुख्यमंत्री अशोकराव चव्हाण यांनी भोकर तालुक्यात मोठ्या प्रमाणावर विकासाची कामे खेचून आणली आहेत.परंतु गेल्या अनेक दिवसांपासून भोकर रोड ते बेंद्री गावचा ३ कि.मी चा मुख्य रस्ता पुर्णतः उखडुन गेला आहे.या रस्त्या वरुन चालणे म्हणजे मृत्युला आमंत्रण आहे.या दैनी रस्ता वर अनेक मोटार सायकल स्वार पडुन जख्मी झाले आहे अशा या मुख्य रस्त्याला निधी मंजुर तिनं किमी रस्त्या चे डांबरीकरण करण्यात यावे.अशी मागणी येथील ग्रा.पं व नागरिकांनी वेळोवेळी निवेदने दिली पण राजकीय व प्रशासकीय अधिकारी याकडे कानाडोळा करीत आहेत.त्यामुळे बेंद्री व बेंद्री तांडा वाशीयात तीव्र नाराजी आहे.त्यामुळे माजी मुख्यमंत्री तरी लक्ष देतील काय असा सवाल जनता करीत आहे.या सोबतच मौजे शिवनगर तांडा पाझर तलावा च्या कामास तांत्रिक मान्यता मिळवुन द्यावे,मौजे मातुळ-बेंद्री, बेंद्री-बल्लाळ, बल्लाळ-नांदा बु.,नांदा बु. -शिवनगर तांडा, बल्लाळ -ईळेगाव आणि ईळेगाल- शिरुर या रस्त्यावरील पुलाची उंची वाढवण्यासाठी निधी उपलब्ध करून द्यावे.मौजे बेंद्री गाव,तांडा व जगराम तांडा येथे वारंवार विद्युत पुरवठा खंडित होत असल्याने याचा फटका सर्वसामान्य नागरिकांना बसत असल्याने येथे स्वतंत्र डी.पि बसवून देण्याची सोय करावी अन भोकर ते बेंद्री येथे राज्य परिवहन महा मंडळ अंतर्गत नियमित बस सेवा फेरी चालु करावे.अशा विवीध विकासाच्या कामा संदर्भात मागणीचे निवेदन माजी मुख्यमंत्री अशोकराव चव्हाण यांच्या कडे केली आहे.यापुर्वीच्या निवेदनाकडे साफ दुर्लक्ष करण्यात आले आहे.त्यामुळे आता तरी या विकासाला चालना मिळेल अशी आशा मौजे बेंद्री व तांडा येथील नागरिकांनी केली आहे.