दोन मोटारसायकलची समोरासमोर जोरदार धडक एक ठार चार जख्मी

  

         प्रतिनिधी  /माली पाटील किनीकर     

 दि.१३-  लहान ते बारड या रस्त्यावरील बारडवाडी या गावा जवळ दोन मोटर सायकलच्या आमनेसामने जोरदार धडक झाली या धडकेत एक जण मृत पावला तर दुसरा गंभीर जख्मी झाला असून इतर दोन महिला व एक मुलगी सुद्धा जख्मी झाल्याची घटना घडली.                                  बारडवाडी येथे दि.१२ रोजी रविवारी सायंकाळी ६ वाजे च्या दरम्यान अपघात घडला.दोन मोटारसायकल स्वार एकदम समोरासमोर येऊन जोराची धडक मारली. यात दोन्ही मोटार चालक गंभीर जख्मी झाले असुन या पैकी मौजे तोंडापुर ता.कळमनुरी येथील रहिवासी असलेला मयत सुनील प्रल्हाद जाधव वय ३१ वर्षे यास मार जबर लागल्याने त्यास उपचारा साठी शासकीय रुग्णालय बारड येथे दाखल केले असता डॉक्टरांनी त्यास मृत घोषित केले.तर दुसऱ्या गाडीवरील बाळु मोहन पवार  वय ३२ वर्षे हे गंभीर जख्मी असुन त्या सोबत असलेल्या सागरबाई बाळु पवार,गोलुबाई पवार व इतर एक महिला जख्मी आहेत.या सर्व जख्मीना रुग्णालयात दाखल केले असून त्यांच्यावर उपचार चालू आहेत. या घटनेची माहिती मिळताच बारड नगरीचे उपसरपंच बाळासाहेब देशमुख व ठाण्यातील पोलीस कर्मचारी धावुन आले.व जख्मीना रुग्णालयात नेण्यासाठी अंबुलंन्सची  ताबडतोब सोय केली व दाखल केले.

Post a Comment

Previous Post Next Post