प्रतिनिधी / माली पाटील
भोकर- महाराष्ट्र शासनाच्या सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागाचा ९१ व्या वर्धापण दिनाचे औचित्य साधुन व स्थापना दिवस साजरा करत भोकर येथील मागासवर्गीय मुला मुलींच्या शासकीय वस्तीगृहात पालक मेळावा संपन्न झाला.
शासकीय मुला मुलींच्या वस्तीगृहात दि. १५ ऑक्टोबर रोजी संपन्न झालेल्या या कार्येक्रर्माच्या अध्यक्षस्थानी एल.ए.हिरे तर प्रमुख अतिथी प्रा. पवार सर डी. बी. कॉलेज, प्रेस संपादक व पत्रकार संघ तालुका अध्यक्ष उत्तम कसबे, जेष्ठ शिवसैनिक तथा प्रेस.संपादक संघ सचिव पत्रकार सुभाष नाईक किनीकर,पत्रकार सुधासुं कांबळे पत्रकार सिद्धार्थ जाधव यांची उपस्थीती होती.
प्रथम शाहु महाराज, ज्योतीबा फुले, डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या तैलचित्राचे पुजन करण्यात आले. या नंतर विद्यार्थ्यांनी आई वडील यांच्या कर्तृत्वार कविता सादर केल्या .सुंधाशु कांबळे पत्रकार, प्रा.पवार सर डी बी.कॉलेज,सुर्यवंशी पालक प्रतिनिधी, प्रेस संपादक व पत्रकार सेवा संघा तालुकाध्यक्ष उत्तम कसबे, गृहपाल उमाकांत जाधव यांनी विद्यार्थ्यांना मागदर्शन केले .
गृहपाल उमाकांत जाधव विद्यार्थ्याना व पालकांना या अशा मेळाव्याला उपस्थित राहुन आमच्या कडुन काही उणीवा असतील तर त्या सांगाव्यात जेणे करुन त्या उणीवा भरुन काढता येतील असे ते बोलाताना सांगितले.अध्यक्षीय समारोप करताना म्हणाले की,या वस्तीगृहात शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांनी आपल्या आई वडिलांच्या इच्छा आकांक्षा पुर्ण करावे.या कार्यक्रमाचे प्रास्ताविक सोनटक्के यांनी केले.तर सुत्रसंचलन राठोड यांनी केले व आभार लांडगे यांनी केले.यावेळी पालक व विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.