प्रतिनिधी / माली पाटील भोकर दि. १६- तालुक्यातील शेतकऱ्यांना शासनाकडून मिळणाऱ्या विविध अनुदानाचे पैसे बँकेत जमा झाले पण बँकेने मात्र थकीत कर्ज असणार्या शेतकऱ्यांना अनुदानाचे पैसे देण्यास टाळाटाळ करत त्या खात्याला होल्ड लावले. त्यामुळे शेतकऱ्यांना पैसे मिळणे बंद झाले.त्यामुळे शेतकऱ्यांत संताप पसरला यामुळे शेतकऱ्यांवरील हा अन्याय लक्षात घेऊन शिवसेना उध्दव बाळासाहेब ठाकरे पक्षाने आक्रमक भूमिका घेत तालुक्यातील स्टेट बँक ऑफ इंडिया व इतर बँकेवर धडक देऊन शेतकऱ्यांच्या खात्याला लावलेले होल्ड काढायला लावुन न्याय दिल्याने शेतकऱ्यांत आनंदाचे वातावरण पसरले असून शेतकऱ्यांना खरा न्याय शिवसेना पक्षच देऊ शकते असे शेतकरी बोलताना दिसुन आले.
भोकर तालुक्यातील बँकाचा मनमानी कारभार चालला असुन ते ग्राहक व शेतकऱ्यांना अडवणूक करण्याचे धोरण अवलंबिले असल्याचे दिसून येते. बँक म्हणजे शेतकऱ्यांची कामधेनू आहे.पण काही शेतकरी वेळेवर कर्जाची परत फेड न केल्याने बँका शेतकऱ्यांना सरकारकडून मिळणारे विवीध अनुदान न देता ते रोखुन ठेवले.व शेतकऱ्यांना यापासून वंचित ठेवले असता शेतकरी या संबंधी विचारणा बँकेकडे केली तेंव्हा थकीत रक्कम भरल्याशिवाय कोणती ही रक्कम मिळणार नसुन सर्वच खात्याला होल्ड लावण्यात आल्याचे सांगितले.यासंबधी शिवसेनेच्या पदाधिकारी यांच्याकडे तक्रार करण्यात आली.तेव्हा यासंबंधी तहसीलदार यांच्याकडे तक्रार करण्यात येऊन शासनाकडून शेतकऱ्यांना मिळणारे पि.एम किसान योजनेचे अनुदान, घरकुल अनुदान,पुरपडी चिबाडी अनुदान,विमा योजनेचे अनुदान अशा सर्वच शासकीय अनुदान बँकेने थांबवु नये.असा आदेश काढला.आणि शिवसेनेचे तालुकाप्रमुख माधव वडगावकर यांनी तालुक्यातील सर्वच बँकेत जाऊन आक्रमक भूमिका घेत होल्ड काढायला लावले.
*किनी येथील एसबीआय बँकेवर शिवसैनिकांचा हल्लाबोल*
शेतकऱ्यांच्या खात्याला होल्ड लावुन जाणुन बुजुन त्रास देत असल्याने किनी येथील एसबीआय बँकेवर दि.१६ ऑक्टोबंर रोजी शिवसैनिकांनी शाब्दिक हल्ला बोल करत बँक प्रशासनाला धारेवर धरले.तालुका प्रमुख माधव वडगावकर, जेष्ठ शिवसैनिक सुभाष नाईक किनीकर, महादावाड,नंदु पाटील,साखरे आदी शिवसैनीकानी व्यवस्थापकास धारेवर धरले.अखेर बँक प्रशासन नमते घेत रोज विस लोकांच्या खात्याचे होल्ड लावलेले काढुन अनुदान मिळालेले पैसे शेतकऱ्यांना देण्यात येणार आहेत.यावेळी किनी येथील बकेसमोर किनी,पाळज, भुरभुशी,दिवशी बु. महागाव,दिवशी खु.मालदरी,नांदा, कोळगाव येथील शेतकरी वर्ग मोठ्या प्रमाणात हजर होते.यावेळी पोलीसांचा कडक बंदोबस्त ठेवण्यात आला. या आंदोलनात उपजिल्हाप्रमुख सतीश देशमुख, तालुका प्रमुख माधव वडगावकर,माजी जि.प.सदस्य सुनील चव्हाण, जेष्ठ शिवसैनिक सुभाष नाईक किनीकर, नंदु पाटील,माजी उप तालुकाप्रमुख मनोहर साखरे,चेरमन तथा माजी उप तालुकाप्रमुख गंगाधर महादावाड, उप तालुका प्रमुख मारोती पवार,सोहम शेट्टे, गंगाधर तुराटीकर, महागाव शाखा प्रमुख तानाजी जाधव, दिवशी बु.शाखा प्रमुख पोशट्टी ईसलवाड, दत्तात्रय राचेवाड, शाखा प्रमुख रामदास कोटावाड, माजी उपसरपंच नारायण आटाळकर, सायारेड्डी प्रेमयगार, गणेश आटाळकर, सरपंच प्रतिनिधी भुमारेड्डी गड्डमवाड, चेरमन शंकरय्या,बोरशेट्टे,राज राव, श्रीनिवास दुसेवाड, जलालसाब आदी उपस्थित होते.