प्रतिनिधी / माली पाटील
भोकर / ता . प्र . / डॉ शंकरराव चव्हाण शासकीय रुग्णालयाचे अधिष्टाता डॉ . एस .आर . वाकोडे यांना खा . हेमंत पाटील यांनी हाती झाडू देऊन शौच्यालय साफ करण्यास भाग पाडले या निंदणीय घटनेचा येथील बिरसा मुंडा सामाजिक विकास समिती तालुका भोकरच्या वतीने तीव्र निषेध करून खासदार यांची खासादारकी रद्य करण्याची मागणी महामहीम द्रोपदी मुर्मु भारतसरकार यांना पाठवलेल्या निवेदनात केली आहे .
खा . हेमंत पाटील यांनी रुग्णालयातील रुग्णांच्या मृत्यू प्रकरणी दि .३ ऑक्टोबर रोजी अधिष्टाता डॉ .एस . आर . वाकोडे यांच्या कक्षात बैठक घेऊन रुग्णालयाची पहाणी करत येथील उणीवा लक्षात न घेता शौचालयात प्रचंड घाण असल्याचे दिसताच उच्चपदस्थ अधिष्टाता डॉ .एस. आर .वाकोडे , व बालरोगतज्ञ डॉ . किशोर राठोड यांच्या हाती झाडू देत शौचालय साफ करण्यास भाग पाडले या निंदनीय घटनेचा तिव्र निषेध होत आहे . येथील आदिवासींची आग्रगण्य संघटना बिरसा मुंडा सामाजिक विकास समिती तालुका भोकरच्या वतीने तीव्र निषेध करून त्यांची तात्काळ खासदारकी रद्य करण्याची मागणी देशाचे राष्ट्रपदी महामहीन द्रौपदी मुर्मु यांना उपविभागी अधिकारी यांच्या मार्फत सोमवार दि . ९ ऑक्टोबर रोजी पाठवलेल्या निवेदनात केली असून निवेदनावर संघटनेचे अध्यक्ष डॉ.अशोक माझळकर , डॉ .उत्तम वागदकर , डॉ रवि वाळके ,सचिव दामेश्वर माझळकर , बी .आर . वाकोडे ,कृष्णा वागरकर , चंपतराव मेंडके , धोंडीबा भिसे , पंडीत वागदकर , माधवराव माझळकर , राजू बुलबुले , सखाराम भिसे , गणेश भिसे , बसाजी डोखळे , संदीप वागदकर यांच्यासह अनेक आदिवासी बांधवांच्या स्वाक्षर्या आहेत .