भोकर तालुक्यात भाजपला भगदड;अनेक कार्यकर्ते अजित पवार गटात



             प्रतिनिधी भोकर/माली पाटील 

भोकर - भोकर तालुक्यात भाजपला गळती लागली असुन या पक्षाचे अनेक कार्यकर्ते पक्षातील कारभारा ला कंटाळून व पक्षात खर्या कार्यकर्त्यांना न्याय मिळत नसल्याने पक्ष सोडून इतर पक्षांत प्रवेश करताना दिसुन येत आहे.

भोकर तालुका तसा काँग्रेस पक्षाचा बालेकिल्ला पण गत पाच वर्षांत या मतदारसंघात भारतीय जनता पार्टी जोमात होते.अनेक लोक भाजपकडे आकृष्ट झाले होते. आज भाजपची परिस्थिती उलटी होत आहे. गत पाच-सहा महिन्यांपासून भाजपला भोकर तालुक्यात मोठी गळती लागल्याचे दिसून येत आहे.जे कार्यकर्ते पक्षासाठी अहोरात्र मेहनत करतात त्या निष्ठावंत कार्यकर्त्यांकडे नेते व पक्ष लक्षच देत नाही.फक्त हुजरेगिरी करणार्याच कार्यकर्त्यांचा दबदबा असतो.हे सर्वच पक्षात आहे.एवढ मात्र नक्की.भोकर तालुक्याती ल भाजप पक्षाच्या कारभारावर नाराज होऊन यापूर्वी राजेश कदम, तुकाराम महादावाड सह अनेक कार्यकर्ते भाजपाला सोडचिठ्ठी देत राष्ट्रवादी पक्षाची कास धरली होती.अन दि.१६ ऑक्टोबर रोजी भाजपा पक्षाचे बचत रचना संयोजक आनंद डांगे व भोकर तालुका अॅटो युनियनचे तालुका अध्यक्ष बंडु पाटील पवार सह अनेक कार्यकर्त्यांनी पक्ष सोडत अजित पवार गटात प्रवेश केला आहे.या सर्व कार्यकर्त्यांचे अजित पवार गटाचे जिल्हा अध्यक्ष विश्वंभर पवार यांनी स्वागत केले आहे.तसेच अजुन काही कार्यकर्ते भाजप सोडण्याच्या विचारात असल्याची चर्चा आहे.


Post a Comment

Previous Post Next Post