भोकर येथे कृषी विभागाच्या 'चला जाऊ गावाकडे' अभियानाची सांगता यास शेतकऱ्यांचा उत्स्फूर्त प्रतिसाद



             प्रतिनिधी / माली पाटील 

महाराष्ट्र शासन कृषी विभाग जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी श्री मा भाऊसाहेब बर्‍हाटे यांच्या संकल्पनेतून दिनांक २१ ऑगस्ट २०२३ पासून सुरू केलेले नांदेड जिल्ह्यातील 'चला जाऊ गावाकडे' सक्षम ग्राम बनवण्यासाठी हे अभियान राबविण्यात आले होते.याची सांगता भोकर येथे संपन्न झाली आहे. 

 या कार्यक्रमाच्या अध्यक्ष स्थानी नांदेड जिल्ह्याचे जिल्हा अधीक्षक  कृषी अधिकारी श्री मा भाऊसाहेब बर्‍हाडे  हे होते तर प्रमुख पाहुणे व प्रमुख वक्ते म्हणून मध्यप्रदेश भोपाळ येथील ताराचंदजी बेलजी व कृ. वि.कें.पोखर्णी येथील वरीष्ठ शास्त्रज्ञ डॉ. देविकांत देशमुख होते.

यावेळी व्यासपीठावर किनवट उपविभागीय कृषी अधिकारी श्री राजकुमार रणवीर,तालुका कृषी अधिकारी श्री.बालाजी मुंडे किनवट,श्री.सदानंद पाटील- हदगाव,श्री.मिरासे-ऊमरी,दिलीप जाधव-भोकर व भोकर मंडळ कृषी अधिकारी श्री मिसाळ व मातूळ चे म.क्.अ.श्री पाईकराव व नागापूर येथील शेतीनिष्ठ आदर्श शेतकरी पुरस्कार प्राप्त शेतकरी बालाजी शामणवाड हे उपस्थित होते.

सदरील कार्यक्रमाचे सूत्रसंचालन येथील कृषी सहाय्यक श्री दिलीप काकडे व प्रस्ताविक श्री.दिलीप जाधव यांनी केले.

 मध्य प्रदेश भोपाळ येथील नैसर्गिक शेतीचे गाढे अभ्यासक ताराचंदजी बेलजी यांनी नैसर्गिक शेती ही काळाची गरज याविषयी सविस्तर मार्गदर्शन केले. त्यानंतर कृषी विज्ञान केंद्र पोखर्णी येथील वरीष्ठ शास्त्रज्ञ डॉ. देविकांत देशमुख यांनी रब्बी पिकाविषयी सविस्तर मार्गदर्शन केले त्यानंतर आपल्या अध्यक्षीय भाषणात जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी श्री.मा.भाऊसाहेब बर्‍हाटे यांनी आपल्या भाषणात शेतकऱ्यानी रासायनिक खताचा व रासायनिक कीटकनाशकाचा वापर अधिक न करता सेंद्रिय शेती व जैविक खत व कीटकनाशकाचा वापर अधिक करून कमी खर्चात अधिक उत्पादन काढण्या विषय मार्गदर्शन करून या अभियानातून शेतकऱ्यासमवेत आलेला आणूभव या कार्यक्रमात व्यक्त करून शेतकऱ्याना शेती करत आसतानाच्या येणार्या अडचणीची होणारा शेती उत्पादनावरील अधिकचा खर्च कमी करण्यास सांगून रब्बी हंगामात कोणती पिके घ्यावी व कोणती पिके घेऊ नये या बाबत सविस्तर मार्गदर्शन करून प्रति हेक्टरी अधिक उत्पादन व अधिक नफा कसा मिळवावा याबाबत शेतकऱ्याना कानमंत्र दिला.यानंतर हादगाव येथील शेतीनिष्ठ आदर्श महिला शेतकरी सौ.स्वाती देव यांनी आपल्या शेतातील सेंद्रिय शेती बद्दलचा अनुभव सांगितला.

यावेळी किनवट उपविभागातील सर्व तालुक्यातील कृषी विभागाच्या विविध योजनांची लाभ घेतलेल्या व चांगल्या पद्धतीने योजणा राबविलेल्या व शेती बरोबर ईतर क्रषि उद्योग व फळबाग लागवड व आहिल्यादेवी होळकर नर्सरी,गाडूळ युनिट,कांदाचाळ,हाळद प्रक्रिया उद्योग उभारणी या सारख्या उल्लेखनीय कार्य केलेल्या शेतीनिष्ठ आदर्श शेतकऱ्यांचे मान्यवरांच्या हस्ते सत्कार करण्यात आले. कार्यक्रमाचे आभार प्रदर्शन किनवट उपविभागाचे उपविभागीय कृषी अधिकारी श्री.मा.राजकुमार रणविर साहेब यांनी केले या कार्यक्रमाची सांगता श्री गुरुदेव सेवा मंडळ यांच्या राष्ट्रवंदनाणी झाली.

 या कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी  भोकर तालुका कृषी अधिकारी कार्यालयातील कृषी पर्यवेक्षक श्री तांडे,श्री सूर्यवंशी,श्री कराळे,गडगीळे, कृषी सहायक श्री इरलेवाड श्री सीतावार श्री काकडे श्री सूर्यवंशी श्री मेटकर श्री.ढहाळे श्री चंचलवार श्री खूपसे श्री कंचेटवारश्रीजाधव,श्री,कुंडलवार,श्री.राठोड,श्री.वाघमारे,श्री.भंगावाड,सौ भक्ते मॅडम,आपटे मॅडम ,आवरूल मॅडम,चांदोडे मॅडम,बुलबुले मॅडम,सोनकांबळे मॅडम,माहुरे मॅडम,तेलंगे मॅडम,काळे मॅडम,श्री बोईनवाड श्री घुमनवाड, श्री जमदाडे,श्री.अनगूलवार,श्री.भास्कर बोरगावकर श्री.पांचाळ यानी प्रयत्न केले.


Post a Comment

Previous Post Next Post