प्रतिनिधी / माली पाटील
नांदेड जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक डबघाईस होती आणि बँकेवर मोठ्या प्रमाणात कर्जाचे डोंगर झाले. कर्ज वसूल होत नाही. त्यामुळे बँक बंद पडण्याच्या मार्गावर होती. म्हणून मी जातीने यात लक्ष घालत नागपूर अधिवेशनात प्रश्न मांडून सरकारकडून ११० कोटी रुपये अनुदान मंजूर करून घेतले. त्यानंतर मी राज्याचा मुख्यमंत्री झाल्यावर ते ११० कोटी रुपये अनुदान माफ केलो. म्हणून बँक सुरू राहिली व आज बँक प्रगती करत आहे.आणि नव संजीवनी मिळालेली असलेल्या या नांदेड जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेने आता पत निर्माण करण्याची गरज आहे, असे प्रतिपादन नांदेड जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या नवीन इमारतीच्या भूमिपूजन सोहळा प्रसंगी माजी मुख्यमंत्री अशोकराव चव्हाण यांनी केली आहे.
नांदेड जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक भोकर शाखेच्या नूतन इमारती च्या भूमिपूजन दिनांक 19 ऑक्टोबर रोजी माजी मुख्यमंत्री अशोकराव चव्हाण यांच्या हस्ते करण्यात आला. या भूमिपूजन सोहळ्याच्या कार्यक्रम अध्यक्षस्थानी बँकेचे नूतन अध्यक्ष मा का भास्करराव पाटील खतगावकर हे होते तर प्रमुख अतिथी म्हणून माजी मंत्री डी पी सावंत सावंत माजी अध्यक्ष तथा मा.आ. वसंत चव्हाण, अमरनाथ राजूरकर ना जिल्हा काँग्रेस अध्यक्ष गोविंदराव नागेलीकर संचालक कैलास देशमुख गोरठेकर पप्पू कोंडेकर आधीची उपस्थिती होती यावेळी अध्यक्ष पदावरून बोलताना बँकेचे अध्यक्ष भास्करराव पाटील खतगावकर म्हणाले की येणाऱ्या काळात जिल्हा बँकेला आधुनिकीकरण करत सोन्याचे दिवस आणू आणि सर्वसामान्य शेतकऱ्याला ही बँक आपली वाटली पाहिजे असे काम करून दाखवू असा विश्वास व्यक्त करत माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांच्या कामाचा आलेख पाहून येणाऱ्या काळात राज्याचे नेतृत्व ते करतील आणि नांदेडचे नाव राज्याच्या नकाशावर विकासाच्या माध्यमातून झळकणार यात शंका नाही असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला या कार्यक्रमास माजी जिल्हा परिषद अध्यक्ष मंगाराणी अंबुलगेकर अंबुलगेकर शामराव टेकाळे डॉक्टर अंकुश देवसरकर आनंद चव्हाण राजेश पावडे राजेंद्र केशवे श्याम कदम शिवराम लुटे उपसभापती बालाजी शानामवाड संचालक सविता रामचंद्र मुसळे शिवसेनेचे अँड. परमेश्वर पांचाळ,माधव वडगावकर, साहेबराव भोंबे, सुभाष नाईक किनीकर, पांडुरंग वर्षेवार, रमेश महागावकर, राष्ट्रवादीचे अध्यक्ष अँड. शिवाजी कदम, आनंद चिट्टे, बँकेचे मुख्य कार्यकारी अधिकारी अजय कदम, भगवान दंडवे, आदिनाथ चिंताकुंटे, सुरेश नरवाडे, रमेश सोळंके शाखा अधिकारी हे उपस्थित होते तर कार्यक्रमाचे सूत्रसंचालन डॉ. मनोज गिमेकर यांनी केले यांनी केले.