महाविकास आघाडीच्या वतीने भोकर येथे भाजपच्या नेत्यांच्या फोटोला जोडे मारुन आंदोलन

 

            भोकर प्रतिनिधी/ माली पाटील 

∆ कंत्राटी पद्धतीचे धोरण हे भाजपचेच असुन युवकांचा राज्यातील रोष पहाता भाजपच्या देवेद्र फडणवीस यांनी आपलं पाप झाकण्यासाठी महाविकास आघाडी वर आरोप करुन मी नाही त्यातली कडी लावा आतली असे करुन जनतेची दिशाभूल करत असल्याने याच्या निषेधार्थ भोकर येथे डॉ.बाबासाहेब आंबेडकर चौकात महाविकास आघाडीच्या वतीने बॅनर वरील भाजपच्या उप मुख्यमंत्री यांच्या फोटोला  जोडे मारुन आंदोलन केले आहे.

 राज्यातील कंत्राटी भरती वरुन राजकारण मोठ्या प्रमाणावर होताना दिसून येत आहे. दि.२२ ऑक्टोबर रोजी रविवारी भोकर येथे महाविकास आघाडीच्या वतीने भाजपला जोडे मारो आंदोलन करत कार्यकर्त्यानी बॅनर वरील उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या फोटोला जोड्याने मारत निषेध केला आहे.या आंदोलनात महाविकास आघाडीतील काँग्रेस, शिवसेना व राष्ट्रवादी काँग्रेस या तिन्ही पक्षाचे कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.यावेळी गोविंद बाबागौड पाटील, संचालक रामचंद्र मुसळे, तालुका अध्यक्ष भगवान दंडवे आणि शिवसेनेचे माजी तालुका संघटक साहेबराव पाटील भोंबे यांनी विचार व्यक्त करताना म्हणाले की, महाराष्ट्रात खाजगीकरण करणं करण्याचे महापाप भाजपचेच केला असुन नायब तहसीलदार, तहसीलदार व पोलीस यांची कंत्राटी भरती करण्याचा निर्णय महायुती सरकारने घेतला आहे.तसेच जर महाविकास आघाडीच्या काळात कंत्राटी भरतीचा जि.आर निघाला तर आज अकरा महिने होत आहेत.मग हे सरकार का विरोध केला नाही.बेरोजगार व विविध पक्षांनी कंत्राटी भरतीच्या विरोधात आवाज उठवला असल्याने हे प्रकरण अंगलट येईल म्हणून खोटे बोला पण रेटुन बोला म्हणारे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी हे पाप महाविकास आघाडीवर ढकलले.मग आघाडीचे कंत्राटी जीआर काढला तर त्या मंत्रीमंडळातील मंत्री हे आता भाजपच्या सरकार मध्ये मांडीला मांडी लावून बसले आहेत.मग त्यांचे राजीनामे घ्या.म्हुण चोर तर चोर वरुन शिरजोर हे जनतेला माहीत आहे.देवेंद्रची चालाखी यातुन दिसुन येत असल्याने मुख्यमंत्री,दोन उपमुख्यमंत्री यांनी नाक घासुन माफी मागावी अशी  कार्यकर्त्यांनी मागणी केली.व बेरोजगार युवकांना व जनतेची दिशाभूल करू नये असेही म्हणाले. यावेळी महाविकास आघाडीच्या कार्यकर्त्यांनी भाजप व विशेष करून उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी करण्यात आली.या जोडोमारो आंदोलनात काँग्रेसचे तालुकाध्यक्ष भगवान दंडवे,माजी सभापती गोविंद गौड पाटील, संचालक रामचंद्र मुसळे, युवक अध्यक्ष अत्रीक पाटील मुंगल,उप सभापती बालाजी सानमवाड, गणेश राठोड, बाबुराव आंदबोरीकर,जवाद्दीन बरबडेकर, डॉ.ईनामदार, शहराध्यक्ष खाजु इनामदार, राष्ट्रवादी काँग्रेसचे शहराध्यक्ष दत्तात्र्यय पांचाळ,आनंद चिट्टे, शिवसेनेचे शहरप्रमुख पांडुरंग वर्षेवार, सुभाष नाईक किनीकर, तालुका संघटक संतोष आलेवाड, चेअरमन साहेबराव पाटील भोंबे,माजी तालुकाप्रमुख प्रदीप पाटील दौलतदार,विक्रम क्षिरसागर,आ.अध्यक्ष ताहेर बेग, सरपंच पाटील, डॉ.मनोज गिमेकर, निळकंठ वर्षेवार, संचालक केशव पाटील पोमनाळकर, विठ्ठल धोंडगे, आदिनाथ चिंताकुंटे, सुरेश कावळे, गोविंद मेटकर,मा.सरपंच भालेराव आदींसह शेकडो कार्यकर्ते सहभागी झाले होते.



Post a Comment

Previous Post Next Post