कै.गोविंद प्रसाद लढ्ढा यांच्या अनाकालीय मृत्यूने लढ्ढा कुटुंबावर दु:खाणे सावट



              वृताकंन/ सुभाष नाईक किनीकर

भोकर दि.२५ -किनी येथील रहिवासी असलेले परंतु सद्यस्थितीत नांदेड येथे स्थिरावलेले,सदा चेहर्यावर हास्य असणारे मृदु स्वभावाचे कै.गोविंद प्रसाद लढ्ढा यांचे अनाकालीय दु:खद निधन झाल्याने लढ्ढा व त्यांच्या मित्र परिवारावर दु:खाचे सावट पसरले आहे.

     मृत्यू हे एक शाश्वत सत्य आहे.जन्म घेतलेली प्रत्येक व्यक्ती कधीना कधी मरणारच ! जीवन अनिश्चित आहे.पण मृत्यू अटळ आहे.खर तर मृत्यू हा जीवनाचा आरंभ आहे.जनन्म हा मृत्युचा आरंभ आहे. मृत्यू शिवाय जन्माला अर्थ नाही.अंधार आहे म्हणून उजेडाला महत्व आहे.असे जरी असले तरी कै.गोविंद लढ्ढा यांचे वय पहाता नियतीने अचानक घाला घातला.

किनी येथे लढ्ढा परीवाराचे घरदार,शेती आहे.गोविंद लढ्ढा हे अत्यंत मृदू स्वभावाचे त्यांनी किनी आपल्या तरुण वयात गावात क्रांती शिक्षण संस्थेच्या माध्यमातून अनेक मित्र मंडळी जमवली.अनेक  विधायक कामात सहभाग घेत असत काही वर्षांपूर्वी ते नांदेड येथे स्थायिक झाले आणि व्हिडिओ शूटिंगचा व्यवसाय सुरू केला.त्यांना दोन  मुले व पत्नी असा परिवार असुन सोबतच मोठा भाऊ पत्रकार गणेश प्रसाद लढ्ढा,दोन बसुनी असा परिवार आहे. कै.गोंविद राधाकिशन लढ्ढा यांचे दि.२३ ऑक्टोबर रोजी सकाळी दुर्दैवी निधन झाले आहे.नियतीने ऐण उमेदीच्या काळातच घाला घातला आहे.त्यांच्या अचानक जाण्याने त्यांच्या कुटुंबीयांवर दु:खाचा डोंगर कोसळला आहे. दि.२५ ऑक्टोबर रोजी त्यांच्या पार्थिव देहाला सायंकाळी ७ वाजता कोठा नांदेड येथे अग्नीचित्ता (अंत्यसंस्कार) देण्यात आली आहे.यावेळी पत्रकार गणेश लढ्ढा, गौरव,शुभम दोन मुलं व पंकज कुटुंब, मित्र परिवार,संगे सोयरे,गावाकडील मंडळी सह शेकडो जन उपस्थित होते.

        

Post a Comment

Previous Post Next Post