ट्रक- मोटारसायकल अपघात सोनारी येथील युवक जागीच ठार




मममममममममममममममम

 भोकर - भोकर तालुक्यातील मौजे सोनारी येथील दोन तरुण नांदेड येथील आपले काम आटोपून भोकरकडे येत असताना मौजे वाकद येथील श्रवण इलेक्ट्रॉनिक्स ऑफिस जवळ येताच भोकरहुन नांदेड कडे जाणार्या भरधाव ट्रकने मोटार सायकलला जोराची धडक दिल्याने यात एक जण जागीच ठार तर दुसरा अती गंभीर जख्मी झाला असल्याची घटना दि. २७ ऑक्टोबर रोजी रात्री घडली आहे.

भोकर तालुक्यातील मौजे सोनारी येथील तरुण निखील संभाजी मामीडवाड वय १९ वर्ष हा निजामबाद येथे खाजगी दवाखान्यात कामावर होता.तो सध्या गावाकडे आलेला होता. नोकरीच्या जाहिराती निघाल्याने ते फार्म भरण्यासाठी म्हणून निखील व त्याचा मित्र मोटारसायकल (क्रं.एम.एच. २६ सी.बी३९७३) वर नांदेडला गेले व काम आटोपून भोकरकडे येत असताना मौजे वाकद येथील श्रवण इलेक्ट्रॉनिक्स ऑफिस जवळ येताच भोकरहुन नांदेड कडे (गुजरातला) जाणारा ट्रक (क्रं. जी.जे.०६ ए व्ही ३४०२) समोरुन जोराची धडक दिल्याने निखील मामीडवाड हा जागीच ठार झाला.व दुसरा मुलगा अती गंभीर जख्मी झाल्याची घटना घडली.या घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली.व ट्रक ताब्यात घेतले आणि चालका विरुध्द गुन्हा दाखल करण्यात आला.पुढील तपास पोलीस निरीक्षक नानासाहेब उबाळे यांच्या मार्गदर्शनाखाली सहायक पोलिस उपनिरीक्षक संभाजी हनवते करत आहेत.

Post a Comment

Previous Post Next Post