भोकर तालुका शिक्षक सेनेच्या अध्यक्षपदी अजित पाटील बेटमोगरेकर तर सचिव म्हणून प्रमोद देशमाने यांची निवड



           प्रतिनिधी /माली पाटील 

शिक्षण क्षेत्रात शिक्षकांच्या अडीअडचणी सोडवणारे अग्रेसिव असलेल्या शिक्षक सेनेची भोकर तालुका कार्यकारणी जाहीर करण्यात आली असून यात तालुका अध्यक्ष म्हणून अजितदादा पाटील बेटमोगरेकर यांची तर सचिव म्हणून प्रमोद देशमाने यांची निवड करण्यात आली आहे.

महाराष्ट्र राज्य शिक्षक सेना नांदेड च्या वतीने दिनांक ८ ऑक्टोंबर २०२३ रोजी भोकर येथील विश्रामगृहावर भोकर तालुका शिक्षक सेनेची कार्यकारणी निवडीची बैठक आयोजित करण्यात आली होती. या बैठकीच्या कार्यक्रम अध्यक्षपदी विठ्ठू भाऊ चव्हाण राज्य उपाध्यक्ष हे होते तर प्रमुख अतिथी म्हणून संतोष पाटील अंबुलगेकर जिल्हा अध्यक्ष, रवी बंडेवार जिल्हा सरचिटणीस, बालाजीराव भांगे जिल्हा उपाध्यक्ष, परमेश्वरा पांचाळ विधानसभा समन्वयक, माधव पा.वडगावकर तालुकाप्रमुख, सुभाष नाईक किनीकर ज्येष्ठ शिवसैनिक, प्रदीप दौलतदार माजी तालुकाप्रमुख हे होते.

 यावेळी प्रथम प्रमुख पाहुण्याचे शाल श्रीफळ देऊन सत्कार करण्यात आले. नंतर जिल्हा सरचिटणीस रवी बंडेवार यांनी शिक्षक सेनेने आतापर्यंत केलेल्या कार्याचे अवलोकन व शिक्षकांसाठी धडाडीने सोडवलेली प्रश्न यावर प्रस्तावित करताना चर्चा केली. यानंतर जिल्हाध्यक्ष संतोष आंबुलगेकर यांनी 'संचालक आपल्या दारी' या संदर्भात पतसंस्थेच्या कर्जवाटप व कर्ज वसुली, नफा तोटा, वसुली व थकबाकीदार याबाबत सभासदांना माहिती दिली तर अध्यक्षीय समारोप करताना विठू भाऊ चव्हाण म्हणाले की, शिक्षक सेना ही एकमेव संघटना जिल्ह्यात जोरदार कार्य करत आहे तसेच शिक्षकांना न्याय देणारी संघटना म्हणून आता शिक्षक सेनेत येण्याचा शिक्षकांचा वाढला असल्याचे त्यांनी सांगितले यावेळी तालुका कार्यकारणी जाहीर करण्यात आली असून यात अध्यक्ष म्हणून डॅशिंग असलेले शिक्षक अजित पाटील बेटमोगरेकर, सचिव म्हणून प्रमोद देशमाने, तालुका उपाध्यक्ष सोनटक्के तर सल्लागार म्हणून कदम यांची निवड जाहीर करण्यात आली आहे. तसेच जिल्हा सल्लागार म्हणून संजय भागवत यांची निवड जाहीर करण्यात आली आहे. यावेळी देविदास जमदाडे, जोशी सर, पत्रकार अनिल डोईफोडे, पत्रकार दत्ता बोईनवाड, प्रेस, संपादक अध्यक्ष उत्तम कसबे, नागनाथ इबीतवार, पुट्टेवार सर, आदीची उपस्थिती होती. हे कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी अजित पाटील व मित्रमंडळी यांनी केले असून कार्यक्रमाचे सूत्रसंचालन शेख सर बरबडेकर यांनी केले आहे.


Post a Comment

Previous Post Next Post