∆ भोकर तालुक्यात पावसाळ्यात मोठ्या प्रमाणावर अतिवृष्टी होऊन नुकसान झाले व पंचनामा ही झाला पण दिवाळी पुर्वी खात्यात पैसे न टाकल्याने शेतकऱ्यांत संताप असुन शासनाने सोमवार पर्यंत अतिवृष्टी अनुदान व पिक विमा शेतकऱ्यांच्या खात्यावर न टाकल्यास शिवसेना उध्दव बाळासाहेब ठाकरे पक्षाकडून आंदोलन करण्याचा इशारा तहसीलदार यांना एका निवेदनाद्वारे केली आहे.
शिवसेना उध्दव बाळासाहेब ठाकरे पक्षाकडून देण्यात आलेल्या निवेदनात म्हटले आहे की, पावसाळ्यात भोकर तालुक्यात मोठी अतिवृष्टी होऊन शेती व पिकांचे मोठे नुकसान झाले होते.व शासनाने पंचनामे करून अनुदान जाहीर करुन दिवाळी पुर्वी शेतकऱ्यांच्या खात्यावर टाकुन दिवाळी गोड करण्याचं शासनाकडून जाहीर करण्यात आले.सोबतच २५ टक्के अग्रीम पिक विमा ही मंजूर झाला. पण डोळ्यांवर पट्टी बांधून कारभार करणाऱ्या सरकारने शेतकऱ्यांना वार्यावर सोडले.त्यामुळे शेतकऱ्यांत सरकार बद्दल प्रचंड रोष आहे.सरकारणे आदींचे पैसे अद्याप दिले नसुन आता गारांचा पाऊस बरसला मोठे नुकसान झाले.मग हे काय अनुदान देणार.त्यामुळे शासनाने त्वरित दि.४ डिसेंबर पर्यंत अनुदान शेतकऱ्यांच्या खात्यावर अनुदान न टाकल्यास शिवसेना आंदोलन करण्याचा इशारा तहसीलदार यांना एका निवेदनाद्वारे दिला.या निवेदनावर संतोष आलेवाड तालुका प्रमुख, सुभाष नाईक किनीकर जिल्हा संघटक, पांडुरंग वर्षेवार शहर प्रमुख, राहुल कोंडलवार शहर संघटक, साहेबराव पाटील भोंबे चेअरमन, रमेश महागावकर, मारोती पवार, विठ्ठल देवोड,श्यामराव मुत्येनपवाड, विशाल बुध्देवाड आदी शिवसैनिकांच्या सह्या आहेत.