भोकर येथे धनगर आरक्षण जागर समितीचे बैठक संपन्न


            प्रतिनिधी/माली पाटील 

∆ भोकर येथे धनगर आरक्षण संदर्भात विचार विनिमय करण्यासाठी नांदेड जिल्हा जागर आंदोलन समितीची बैठक येथील विश्रामगृहावर पार पडली आहे.

भोकर येथे १  डिसेंबर २०२३  रोजी ठीक ६ वाजता सकल धनगर समाजाची बैठक संपन्न झाली. या बैठकीला नांदेड जिल्हा जागर आंदोलन समितीच्या नेते मंडळीचे मार्गदर्शन लाभले. या समितीचे प्रमुख समाजभूषण नागोराव शेंडगे बापू ,निवृत्त सेवा अधिकारी दिगंबरराव खटके, मल्हार सेनेचे एकनाथ धमणे, युवा नेते शिवकांत मैलारे, निलेश टकले, दत्तात्रय खंडेराय, संतोष कुंठे, पंढरीनाथ कुंठे, साई किरण सलगरे, मारुती श्रीगिर, बाळासाहेब बारसे यांची उपस्थिती होती. यावेळी जागर समितीच्या सर्व प्रमुख यांचा भोकर तालुका सकल धनगर समाजाच्या वतीने सन्मान करण्यात आला. यावेळी शिवकांत मैलारे, नागोराव शेंडगे बापू, एकनाथ धमणे यांनी उपस्थित सकल धनगर समाजाच्या लोकांना मार्गदर्शन केले. महाराष्ट्रात मोठ्या प्रमाणावर धनगर समाज एसटी आरक्षण अंमलबजावणी व्हावी यासाठी ठिकठिकाणी आंदोलने, धरणे, रास्ता रोको आदी  मोठ्या प्रमाणात करण्यात येत आहेत. परंतु नांदेड जिल्ह्या अद्यापही शांत असल्याने जिल्ह्यातही धनगर आरक्षण  एसटी  अंमल बजावणी करण्यात यावी यासाठी आंदोलन, धरणे व उपोषण उभारण्यासाठी जिल्ह्यात जेष्ठ नेते नागोराव शेंडगे बापू यांच्या उपस्थितीत धनगर आरक्षण जागर समितीने जिल्ह्यातील १६ तालुक्याचा दौरा करून समाजाच्या व्यथा व भेटी घेण्यात येत आहे. यातुनच पुढील दिशा ठरविण्यात येणार आहे. त्यामुळे भोकर तालुक्यातील धनगर समाज ही एस.टी आंदोलनासाठी तत्पर रहावे असे जागर समितीच्या सदस्यांनी केली.यावेळी व्याख्याते बालाजी ‌वरवटे यांनी छान विचार मांडले.या बैठकीत जेष्ठ नेते हरीभाऊ हाके पाटील, सुभाष नाईक किनीकर,व्यंकट पा. वाडेकर, सर्जेराव शिंदे, राजेश हाके पाटील, बालाजी कोकणे,निलेश चिकाळकर, खंडू गोरे, मारोती वरणे, साहेबराव पाटील भोंबे,धुळबा शिंदे,संजय देवकाते, सुशील शिंदे, बागडे,माने,आदी धनगर बांधव मोठ्या प्रमाणावर हजर होते. या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सुभाष नाईक किनीकर तर आभार व्यंकट वाडेकर यांनी केले.


Post a Comment

Previous Post Next Post