शिवसेनेच्या आंदोलन छेडण्याच्या इशाराचा महसूल प्रशासनाकडून दखल अतिवृष्टी अनुदान शेतकऱ्यांच्या खात्यावर जमा


                प्रतिनिधी / माली पाटील 

              दि. ५ डिसेंबर २०२३  मंगळवार 

∆ भोकर तालुक्यातील शेतकऱ्यांच्या खात्यात जून जुलैमध्ये झालेल्या अतिवृष्टी अनुदान व पिक विमा बोनस शेतकऱ्यांच्या खात्यावर सोमवार (४डिसेंबर) पर्यंत न जमा केल्यास शिवसेना ठाकरे पक्षाकडून  आंदोलन करण्याचा इशारा देण्यात आला होता. याची महसूल  प्रशासनाने दखल घेत दि. ४ डिसेंबर रोज सोमवारी पासून अतिवृष्टी अनुदान तालुक्यातील २२ गावच्या शेतकऱ्याच्या खात्यावर टाकल्याचे तहसीलदार राजेश लांडगे यांनी शिवसेनेच्या शिष्टमंडळाला सांगितल्याने शिवसेनेकडून होणारे आंदोलन स्थगित करण्यात आल्याची माहिती तालुकाप्रमुख संतोष आलेवाड यांनी जाहीर केले आहे.

   जुन-जुलै मध्ये भोकर तालुक्यात अतिवृष्टी होऊन शेतीचे मोठे नुकसान झाले होते.शासनाकडुन मदत ही जाहीर झाली.ही अनुदान रुपी मदत दिवाळी पुर्वी शेतकऱ्यांच्या खात्यावर टाकुन दिवाळी गोड करणार म्हणून आश्वासन दिले पण अद्यापही अनुदान शेतकऱ्यांच्या खात्यावर टाकले नसल्याने शिवसेना उध्दव बाळासाहेब ठाकरे पक्षाकडून दि.१ डिसेंबर रोजी महसूल प्रशासनाकडे अतिवृष्टी अनुदान व पिक विमा बोनस शेतकऱ्यांच्या खात्यावर दि.४ डिसेंबर सोमवार पर्यंत न टाकल्यास तीव्र आंदोलन छेडण्याचा इशारा एका निवेदनाद्वारे देण्यात आला होता.दि ४ रोजी शिवसेनेचे शिष्टमंडळाने तहसीलदार राजेश लांडगे यांच्या दालनात बैठक घेतली असता तहसीलदार राजेश लांडगे यांनी शिवसेनेच्या आंदोलना ची दखल घेत दि.४ म्हणजे आजपासून अनुदान वाटपास सुरुवात केली असुन तालुक्यातील २२ गावच्या शेतकऱ्याच्या खात्यावर पैसे जमा केल्याचे सांगितले.व पिक विमा संदर्भात मात्र विमा कंपन्या सहकार्य करीत नसल्याचे सांगितले.यावेळी तहसीलदार दालनात शिवसेना जिल्हा उप-संघटक सुभाष नाईक किनीकर, तालुका प्रमुख संतोष आलेवाड, जेष्ठ शिवसैनिक साहेबराव पाटील भोंबे,माजी सर्कल प्रमुख रमेश महागावकर, सरपंच रामदास जोंधळे, पत्रकार संघाचे अध्यक्ष उत्तम कसबे, विठ्ठल देवोड, विशाल बुध्देवाड आदी जन उपस्थित होते.



Post a Comment

Previous Post Next Post